नागपूर - नागपूर शहरातील अत्यंत वर्दळीचे ठिकाण असलेल्या शंकर नगर चौकातील पेट्रोल पंपा ( Petrol Pump in Shankar Nagar Chowk in nagpur) जवळ रात्री उशिरा एकाची निर्घृणपणे खून (brutal murder of one ) करण्यात आली आहे. सरोज खान ( Saroj Khan murder ) असे हत्या झालेल्या इसमाचे नाव असून तो कुख्यात गुंड शेखुचा भाऊ असल्याची माहिती पुढे आली आहे. क्षुल्लक वादातून उद्भवलेल्या वादातून पाच आरोपींनी सरोजची हत्या ( Assassination of Saroj ) झाल्याचा संशय पोलीस उपायुक्त लोहित मतानी यांनी प्रथमदर्शनी तपासाच्या आधारे व्यक्त केला आहे. आरोपींनी सरोज खानची हत्या केल्यानंतर पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याची तोडफोड करुन डीव्हीआर चोरून नेला आहे. त्यामुळे सरोज खानची हत्या पूर्वनियोजित असल्याचा संशय व्यक्त केला जातं आहे. सध्या पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे.
हेही वाचा - Sangli Accident : सांगलीत मोटरसायकलची समोरासमोर धडक, दोन युवक ठार तर दोन जखमी
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नुकसान - पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेळ रात्री साडे दहा वाजताची होती. सरोज खान नामक इसम शंकर नगर चौकाकडून त्याच्या मानकापूर येथील निवासस्थानाकडे निघाले होते. त्याच वेळी आरोपींच्या ऑटोला सरोज खानच्या कारचा कट लागला. त्यामुळे संतापलेल्या आरोपींनी पेट्रोल पंप परिसरात सरोज सोबत भांडण केलं. त्यावेळी तिथे पडलेल्या (पेअर) गट्टूने त्यांच्यावर हल्ला केला. ज्यामुळे सरोजचा जागीच मृत्यू झाला. त्यानंतर सर्व आरोपी ऑटोमध्ये बसून पळून गेले. मात्र, त्यापूर्वी आरोपींनी पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे नुकसान करून डिव्हीआर चोरून नेला आहे.
२०१३ साली त्याच ठिकाणी झाली होती हत्या - या प्रकरणात महत्त्वाचे म्हणजे २०१३ साली त्याच ठिकाणी एकाची हत्या झाली होती. त्यात भारतीय जनता पक्षा युवा मोर्चाचे नेते हेमंत दीयेवार यांची हत्या झाली होती. त्या प्रकरणात मृतकाचा भाऊ मुख्य आरोपी होता. त्यामुळे त्या प्रकरणाशी या प्रकरणाचा संबंध जोडला जात आहे. मात्र, प्राथमिक तपासानंतर पोलिसांनी ही शक्यता फेटाळून लावली आहे.
हेही वाचा - पूर्णियामध्ये 6 वर्षीय मुलाची गळा चिरुन हत्या; हत्येनंतर आरोपींनी केले 'हे' कृत्य