ETV Bharat / city

संजय राऊत शिवसेनेचे नाहीत तर शरद पवारांचे प्रवक्ते, नाना पटोलेंची टीका - संजय राऊत शिवसेनेचे नाहीत तर शरद पवारांचे प्रवक्ते

संजय राऊत हे शरद पवार यांचे प्रवक्ते झाले आहेत. शिवसेनेचे खासदार किंवा सेनेचे प्रवक्ते राहिलेले नाहीत, अशा पद्धतीने ते वक्तव्य करत असल्याची टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

Nana Patole
Nana Patole
author img

By

Published : Mar 27, 2021, 3:34 PM IST

नागपूर - संजय राऊत हे शरद पवार यांचे प्रवक्ते झाले आहेत. शिवसेनेचे खासदार किंवा सेनेचे प्रवक्ते राहिलेले नाहीत, अशा पद्धतीने ते वक्तव्य करत असल्याची टीका कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. काँग्रेसविषयी बोलण्याचा त्यांना अधिकार नाही. याबाबत आपण मुख्यमंत्र्यांशी बोलणार असल्याचे व आमच्या नेत्याबाबत कुठल्याही व्यक्तीने बोलणे आम्हाला मान्य नसल्याचे सांगणार आहे, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली. ते नागपूर विमानळावर माध्यमांशी बोलत होते.

नाना पटोले माध्यमांशी बोलताना
अधिकारी राजकीय पक्षाला बांधील होणे लोकशाहीसाठी घातक -

पटोले म्हणाले, की आमची सुरवातीपासून भूमिका आहे की, मोठ्या अधिकाऱ्याने पक्षाला बांधील होऊन कटपुतली बनू नये. अधिकाऱ्यांना मिळालेल्या पदाचा फायदा सामान्य जनतेला मिळावा, ही काँग्रेस पक्षाची भूमिका आहे. पण मागील काही काळापासून वरिष्ठ अधिकारी राजकीय पक्षाला समर्पित झाल्याप्रमाणे वागत आहेत, ते लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचे रश्मी शुक्ला प्रकरणात बोलताना पटोले म्हणाले. ते म्हणाले की, प्रशासनासाठी हे घातक आहे. जे काही रश्मी शुक्ला प्रकरणात समोर आले आहे त्यात चौकशी सुरू झाली आहे.

फडणवीस राज्याला बदनाम करण्याचे काम करत आहेत -

हे ही वाचा - कर्मचाऱ्यांसाठी सक्षम अन्याय निवारण यंत्रणा उभारावी, सुप्रिया सुळेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
भाजपने राज्याला बदनाम करण्याचे काम केले आहे. फडणवीस ज्या पद्धतीने राज्य सरकारवर आरोप लावत आहेत, मग ते सुशांतसिंह प्रकरण असो की वाझे, परमबीर सिंह प्रकरण घेऊन राज्याची बदनामी करण्याचे काम फडणवीसांनी केलं आहे. यात चौकशी झाली पाहिजे. राज्याची बदनामी करण्याचे काम ज्या पध्दतीने देवेंद्र फडणवीस करत आहेत. त्यांनी जे आरोप लावले ते खरे निघाले नाहीत, खोटारडी प्रवृत्ती समोर आली आहे. मागच्या सरकारच्या गडबडी झाल्या त्यात सातत्याने आरोप करण्याचे काम त्यांनी केले आहे. यात जस्टीस लोया प्रकरण पुढे येतील. यावर केंद्रीय नेतृत्व लक्ष देऊन आहे.

हे ही वाचा - राज्यातील 5 आयएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.