ETV Bharat / city

Raut On Modi : राऊत कडाडले! म्हणाले, दिल्लीतील पुतीनचा आमच्यावर CBI, ED नावाच्या मिसाईलने हल्ला

सध्या रशिया युक्रेनमध्ये युद्ध सुरू आहे. तसे युद्ध आपल्याकडे सुरू नसले तरी दिल्लीत पुतीन बसले आहेत. (Sanjay Raut criticizes the central government) ते रोज आपच्यावर ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्स नावाच्या मिसाईल सोडत आहेत, अशी नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुतीन यांची उपादी देत शिवसेना नेते संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. ते नागपूरमध्ये बोलत होते.

शिवसेना नेते संजय राऊत
शिवसेना नेते संजय राऊत
author img

By

Published : Mar 24, 2022, 7:53 AM IST

Updated : Mar 24, 2022, 8:34 AM IST

नागपूर - आमच्या सारखे लोक युद्धाचा अनुभव घेत असतात. आपल्या देशात रशिया-युक्रेन सारखे युद्ध सुरू नाही. मात्र, दिल्लीत पुतीन बसले असून ते रोज आमच्यावर ईडी, सीबीआय इन्कम टॅक्स नावाच्या मिसाईल सोडत आहेत, अशी नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पुतीन यांची उपाधी देऊन शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे. (Raut criticise against Modi) ते नागपुरमध्ये आयोजीत एका कार्यक्रमात बोलत होते. राज्यातील काही नेत्यांना ईडीने अटक केली आहे, तर काहींची चौकशी सुरु आहे. अशातच परवा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हूण्यांवर ईडीकडून कारवाई करण्यात आली.

ज्या राज्यात आपले सरकार नाही, त्या राज्यातील लोकांना अधिक सन्मानाने वागवले पाहिजे, अशी शिकवण आम्हाला माजी पंतप्रधान पंडित नेहरूं कडून मिळाली आहे. (Sanjay Raut called Modi Putin) जे आपल्या विचारांचे नाहीत त्यांचाही सन्मान करणे ही लोकशाही आहे. आपली टिमकी न वाजवता सर्वांचा सन्मान केला पाहिजे अशी शिकवण यशवंतराव चव्हाण यांनी दिली आहे. पण आजच्या घडीला पत्रकारितेचे काम बदलले आहे असे दुर्दैवाने म्हणावे लागेल, अशी खंतही राऊत यांनी व्यक्त केली आहे.

ईडीने नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मेहुण्याची संपत्ती ताब्यात घेतली. त्यानंतर राऊत यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला. मोदी सरकार केंद्रीय यंत्रणेचा वापर करून महाविकास आघाडीवर दबाव टाकण्याचे काम करत आहे. (Sanjay Raut's visit to Nagpur) केवळ आमच्याकडेच पैसा आहे, असे म्हणत भीती दाखवण्याचे राक्षसी पद्धतीचे काम महाराष्ट्रात सुरू आहे. एका मागून एक होत असलेल्या ईडीच्या कारवाई विरोधात शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी जोरदार हल्ला चढवला आहे.

हेही वाचा - आम्ही अक्कलकोट, सोलापूर दिले अन् बेळगाव घेतले : कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची मुक्ताफळे

Last Updated : Mar 24, 2022, 8:34 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.