नागपूर - आज मुंबईत मोठा राडा सुरू आहे. मातोश्रीवर हनुमान चालीसा (Rana Couple Hanuman Chalisa at Matoshree) वाचायला गेले हाच सर्वात मोठा विनोद आहे. ज्या शिवसेनेचा जन्म हिंदुत्वासाठी झाला त्या शिवसेनेला ही कालची पोरं हिंदुत्वाचा पाठ शिकवणार का? हे भाडोत्री लोकं आहेत. भाजपच्या नेत्यांना काही काम नाहीत. हे लोकं केंद्रातील महागाईवर बोलणार नाहीत, अशी जोरदार टीका शिवसेनेचे नेते संजय राऊत (Sanjay Raut on BJP and Rana Couple) भाजप आणि राणा दाम्पत्यांवर केली आहे. ते नागपुरात दिपटी सिग्नल येथील पदाधिकारी मेळाव्यात बोलत होते.
हेही वाचा - Navneet Rana Vs Shivsena : संजय राऊत फक्त पोपटासारखी बडबड करतात; नवनीत राणांची टीका
लोकं नागपूरला स्वतःची जहागीर समजतात - देशातील तरुण बेरोजगार झाले आहेत. मात्र, त्यावर बोलायला कोणी तयार नाही, मुंबईत काही लोक राडा करत आहेत. मुंबईत जाऊन हनुमान चालीसा वाचतात, अमरावतीवाले फिल्मी सी ग्रेडचे हे लोक आहेत, आम्हाला हनुमान चालीसा शिकवणार का? अशी टीका करत भाजप आणि राणा दाम्पत्यावर राऊतांनी हल्ला चढवला. शिवसेनेसोबत पंगा घेऊ नका खूप महागात पडणार, काही लोकं नागपूरला स्वतःची जहागीर समजतात, नागपूर फक्त आमचे आहे असे म्हणणाऱ्यांना सांगू इच्छितो ते स्वप्न विसरा. यानंतर महापालिकेची, विधानसभेची निवडणूक असो की लोकसभेची निवडणूक असो नागपूरचा इतिहास लिहताना शिवसेनेचे नाव लिहिले जाईल असेही संजय राऊत म्हणाले.
रामाचे धनुष्यबान आणि हनुमानाची गदा आमच्याजवळ - हनुमान चालीसा नक्की वाचा श्रद्धेचा विषय आहे. बजरंग बली हनुमान प्रभू श्रीराम हे आमचे श्रद्धेचे स्थान आहे. जेव्हा युद्धात हजारो शिवसैनिक आयोध्याच्या लढ्यात सामील झाले होते, त्यावेळी बाकीचे कुठे गेले होते. अनेकजण शिवसेनेचे सैनिक शहीद झाले होते. त्यांच्याशी आमचा काही संबंध नाही असे अनेक नेते म्हणाले, तेव्हा बाळासाहेब ठाकरे देशात एकच नेता होता ज्यांनी सांगितले हे काम जर का माझ्या शिवसैनिकांनी केले असेल तर मला त्यांचा अभिमान आहे. आता हे लोक(भाजप, राणा दम्पत्य) आम्हाला हनुमान चालीसेचा पाठ शिकवायला निघाले. रामाचे धनुष्यबान आणि हनुमानाची गदा आमच्याजवळ आहे. आमच्यासोबत लढाई करू नका लढाई करायची आहे, तर लडाखच्या सीमेवर जाऊन लढा, तिथे का शेपूट घालून बसतात आणि इथे मुंबईत येऊन हनुमान चालीसा वाचतात.
हेही वाचा - Rana vs Shivsena : 'बंटी-बबलीला पोहचू द्या! मुंबईचे पाणी त्यांना माहीत नाही'