ETV Bharat / city

नागपुरात महिन्याभरातील कोरोना रुग्णांच्या मृत्यूची संख्या गंभीर : देवेंद्र फडणवीस - nagpur corona updates

नागपूर शहरासह जिल्ह्यातही रूग्णांची संख्या वाढत आहेत. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (सोमवार) महारानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेतली. शहरातील मृत्यूदर वाढत चालला आहे. त्यानुसार तो कमी करण्यासाठी ट्रेसिंगचे प्रमाण वाढवणे गरजेचे असल्याचे फडणवीस यांनी यावेळी सुचवले.

Leader of Opposition Devendra Fadnavis
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस
author img

By

Published : Aug 17, 2020, 5:35 PM IST

नागपूर - राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. नागपूर शहरासह जिल्ह्यातही रूग्णांची संख्या वाढत आहेत. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आज (सोमवार) महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची भेट घेतली. शहरातील मृत्यूदर वाढत चालला आहे. त्यानुसार तो कमी करण्यासाठी ट्रेसिंगचे प्रमाण वाढवणे गरजेचे असल्याचे फडणवीस यांनी यावेळी सुचवले. महानगरपालिका आयुक्त, महापौर आणि इतर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थित ही बैठक पार पडली.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची प्रतिक्रिया...

हेही वाचा - 'फक्त महाराष्ट्रातील नव्हे, तर संजय राऊतांनी संपूर्ण जगातील डॉक्टरांची माफी मागावी'

कोरोनाची वाढत चाललेली स्थिती धक्कादायक ठरत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यातील विविध शहरातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा दौरा सुरू आहे. नागपुरातही कोरोना रूग्णांची खास करून मृत्यूदरात होत असलेली वाढ याबाबत फडणवीस यांनी महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे आणि महापौर यांच्यात बैठक पार पडली. यात शहरातील वाढता मृत्यूदर रोखण्यासाठी टेस्टिंगचे प्रमाण वाढवणे आवश्यक असल्याचे यावेळी फडणवीस यांनी सुचवले.

ऑगस्ट महिन्यात कोरोना रूग्ण संख्येत झालेली वाढ चिंताजनक असल्याचेही फडणवीस यांनी सांगितले. शिवाय टेस्टिंगचे प्रमाण ३ हजारावरून ५ हजारापर्यंत करण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर अत्याधुनिक बेड व्यवस्थेत देखील वाढ करण्याची गरज आहे. जेणेकरून वाढती रूग्णसंख्या नियंत्रणात आणण्यास मदत होईल, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

सदर बैठकीत खासगी संस्थासोबत करार करून कोविड केअर सेंटर तयार करता येईल का? या बाबतही सूचना दिल्या असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. शिवाय नॉन कोविड रूग्णालयाचे कोविड रूग्णालयाशी करार करून मनुष्यबळ वाढवता येईल, अशा सुचानाही यावेळी दिल्याचे फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळे अशा प्रकारची तयारी आपण केली तर वाढत्या रूग्णसंख्येला आळा घालता येऊ शकते असेही त्यांनी सांगितले.

हेही वाचा - संजय राऊतांप्रमाणेच तुमचीही डॉक्टरांबाबत हीच भूमिका आहे का? मार्डचा मुख्यमंत्र्यांना सवाल

येणाऱ्या काळातही नागपुरात रूग्ण संख्या वाढू शकते आणि याच पार्श्वभूमीवर विशेष लक्ष देणे गरजेचे असल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. त्याचबरोबर होम आयसोलेशनमध्ये असणाऱ्या रूग्णांना समुपदेशन करण्याची गरज असाल्याचेही त्यांनी या बैठकीत सुचवले. या बैठकीत भाजपा आमदार आणि भाजपा पदाधिकारी देखील उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.