ETV Bharat / city

निवृत्त एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकरांनी त्यावेळी दाखवलेले 'हे' कौशल्य आज भारतीय सेनेसाठी उपयोगाचे... - दौलत बेग ओल्डी

सूर्यकांत चाफेकर यांनी दाखवलेल्या या धैर्याबद्दल त्यांना शौर्य चक्र प्रदान करण्यात आले आहे. चाफेकर यांनी 100 हून अधिक वेळा तिथे विमान उतरवले आणि ही धावपट्टी वायुसेनेसाठी नियमित सरावासाठी उपलब्ध करून दिली. आज याच धावपट्टीचा वापर चीन सीमेवर भारतीय लष्कराला केवळ 20 मिनिटात पोहचवण्यासाठी होत आहे.

suryakant chafekar
निवृत्त एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर
author img

By

Published : Jun 8, 2020, 7:49 PM IST

नागपूर - चीनची भारताच्या हद्दीत वाढत्या घुसखोरीमुळे दोन्ही देशामधील संबंध तणावपूर्ण झाले आहेत. कोरोना प्रसारात चीन आंतरराष्ट्रीय स्तरावर उघडा पडला असताना देखील शेजारील राष्ट्रांच्या हद्दीत घुसखोरी करून स्वतःचा निर्लज्जपणा दाखवून देत आहे. चीनच्या कुरापतींवर अंकुश ठेवण्यासाठी भारताने जगातील सर्वोच्च ठिकाण असलेल्या दौलत बेग ओल्डी येथे विमान उतरवण्याचे धाडस २००८ साली दाखवले होते. भारतीय सैन्याला हवी तेव्हा रसद पुरवता यावी म्हणून नागपूरकर असलेले एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर यांनी त्यावेळी दाखवलेले कर्तृत्व आज सैन्यासाठी फार उपयोगाचे ठरत आहे.

निवृत्त एअर व्हाईस मार्शल सूर्यकांत चाफेकर

भारत-चीनमध्ये सध्या सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर 2008 साली भारतीय वायू सेनेने घेतलेल्या एका अतिशय महत्वपूर्ण धाडसाचा फायदा यावेळी भारतीय लष्कराला होत आहे. समुद्रसपाटीपासून तब्बल 16 हजार 700 फूट उंचीवर हवाई धावपट्टी तयार करून विमान उतरवण्याचे कौशल वायू सेनेचे तत्कालीन ग्रुप कॅप्टन सूर्यकांत चाफेकर यांनी करून दाखवले होते. चीनपासून अतिशय जवळ असलेल्या लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळच्या दौलत बेग ओल्डी येथे ही जगातील सर्वात उंच धावपट्टी तयार करून विमान उतरवण्यात आले. ही धावपट्टी चहुबाजूने उंच पर्वतांनी वेढलेली आहे, शिवाय येथे प्राणवायूचे प्रमाण 40 टक्क्यांनी कमी असल्याने विमान उतरवणे सोपे नसते. तिथे जाण्यासाठी रस्तादेखील नसल्याने केवळ पायी जाण्यासाठी 22 दिवस लागतात. नैसर्गिक अडचणी व चीनशी वाद नको म्हणून 1962 च्या चीनशी झालेल्या युद्धानंतर दौलत बाग ओल्डी येथे हवाई हालचाली करण्यास भारताने पुढाकार घेतला नाही. परंतु, भविष्यातील गरज ओळखून ग्रुप कॅप्टन सूर्यकांत चाफेकर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना तिथे धावपट्टी तयार करून ट्रायल घेण्याची विनंती केली व 31 मे 2008 मध्ये 43 वर्षांनी एएन -32 विमान उतरवले.

सूर्यकांत चाफेकर यांनी दाखवलेल्या या धैर्याबद्दल त्यांना शौर्य चक्र प्रदान करण्यात आले आहे. चाफेकर यांनी 100 हून अधिक वेळा तिथे विमान उतरवले आणि ही धावपट्टी वायुसेनेसाठी नियमित सरावासाठी उपलब्ध करून दिली. आज याच धावपट्टीचा वापर चीन सीमेवर भारतीय लष्कराला केवळ 20 मिनिटात पोहचवण्यासाठी होत आहे. येथून सर्वात जवळची धावपट्टी लेह येथे आहे, जेथून सैनिकांना सीमेवर पोहचण्यासाठी 20 दिवसांचा कालावधी लागतो. मात्र, सैन्य अधिकाऱ्यांच्या धाडसाने देशाला सीमा सुरक्षेचा एक नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. सूर्यकांत चाफेकर एअर वाईस मार्शल म्हणून निवृत्त झाले असले तरी तेव्हाच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत.

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.