ETV Bharat / city

Monkeys Rescue Nagpur : हरितसेतू ठरला जीवनदान सेतू; पुराच्या पाण्यात अडकडलेल्या सहा माकडांची सुखरूप सुटका - हरितसेतूच्या माध्यमातून माकडांना वाचविले

वनविभागाने काही स्वयंसेवी संस्थाच्या मदतीने तयार केलेला 'हरितसेतू' जीवनदान देणारा सेतू सिद्ध झाला आहे. तीन दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर सात पैकी सहा माकडांनी ( Rescue of monkeys trapped in flood Nagpur ) वनविभागाच्या प्रयत्नांना प्रतिसाद देत स्वतःची सुखरूप सुटका करून घेतली आहे.

माकडांना वाचविताना टीम
माकडांना वाचविताना टीम
author img

By

Published : Jul 22, 2022, 4:59 PM IST

Updated : Jul 22, 2022, 5:54 PM IST

नागपूर - पुराच्या पाण्यात अडकडलेल्या सहा माकडांना वाचवण्यासाठी वनविभागाने काही स्वयंसेवी संस्थाच्या मदतीने तयार केलेला 'हरितसेतू' जीवनदान देणारा सेतू सिद्ध झाला आहे. तीन दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर सात पैकी सहा माकडांनी ( Rescue of monkeys trapped in flood Nagpur ) वनविभागाच्या प्रयत्नांना प्रतिसाद देत स्वतःची सुखरूप सुटका करून घेतली आहे. मात्र, अद्यापही माकडाचे एक पिल्लू विजेच्या हायटेंशन लाईनवर अडकून असल्याने त्याला वाचवण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा वनविभाग आणि स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून केली जात आहे.

माकडांची पुराच्या पाण्यातून सुटका करतांनाची दृश्य

नागपूर शहरापासून काही अंतरावर असलेल्या गोरेवाडा लगतच्या माहूरझरी गावाच्या शेजारी असलेल्या उच्चदाब विजेच्या खांबावर काही दिवसांपासून सात माकडे फसली आहेत. गेल्या चार दिवसांपासून त्यांना वाढवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, माकडे प्रतिसाद देत नसल्याने ही मोहीम लांबली होती. सात पैकी सहा माकडे हरित सेतूच्या मदतीने पुराच्या पाण्यातून बाहेर पडण्याचा यशस्वी झाली आहेत, केवळ माकड बाहेर पडणे बाकी आहे.

प्रयत्नांचा घटनाक्रम : पाहिल्या दिवशी दोर बांधून माकडांना सुखरूप बाहेर काढायचा प्रयत्न केला, परंतु त्याला यश आले नाही. दुसऱ्या दिवशी अग्निशमन दलाच्या बोट लावण्यात आल्या होत्या. खूप वेळ वाट बघितली परंतु त्याही दिवशी बंदर काही केल्या आले नाही.

'हरितसेतू' उभारला : माकडं बचाव पथकाला प्रतिसाद देत नसल्याचे लक्षात आल्यानंतर आज ( शुक्रवारी ) ड्रम आणून तराफे तयार करण्यात आले आहेत. बरेच तराफे तयार करून त्यांना एकमेकांना जोडून जाळीच्या साहाय्याने सेतू तयार करण्यात आला आहे. नागपूर महानगर पालिकेच्या अग्निशमन दलाची मदत घेऊन हा सेतू टॉवरपासून ते जमिनीपर्यंत बांधण्यात आला. त्यावर बंदरांना खायला फळे टाकण्यात आली आणि आज हा सेतू बांधून त्यांना काठावर येण्याचा मार्ग तयार केला आहे. या सर्व बंदराच्या बचाव कार्यात सेमिनरी हिल्स वनपरिक्षेत्र, वनविभाग नागपूर ट्रान्झिट ट्रीटमेंट सेन्टर, व अग्निशमन विभाग नागपूर महानगरपालिका सहभागी आहेत.

हेही वाचा - Car flash Flood : कार पुराच्या पाण्यात केली वाहून; पाहा व्हिडिओ

Last Updated : Jul 22, 2022, 5:54 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.