ETV Bharat / city

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंना झटका; स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट प्रकल्पात सीईओ पदावरून हटवले - तुकाराम मुंढेमुळे खासगी कंत्राटदारांना फायदा

नागपूर महानगर स्मार्ट सिटी प्रोजेक्टचे सीईओ नसताना देखील त्यांनी सीईओ पदाची सूत्रे आपल्या हातात घेतली. त्यानंतर त्यांनी खासगी कंत्राटदारांना फायदा होईल, असे निर्णय घेतल्याचा आरोप महापौर संदिप जोशी यांनी केला होता. त्यावरून आज मुंढे यांना स्मार्ट सिटी प्रोजेक्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरुन हटवण्यात आले आहे.

nagpur
आयुक्त तुकाराम मुंढे
author img

By

Published : Jul 10, 2020, 4:58 PM IST

Updated : Jul 10, 2020, 5:30 PM IST

नागपूर - महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट प्रकल्पाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरुन हटवण्यात आले आहे. आज झालेल्या बैठकीत या योजनेचे मुख्य संचालक प्रवीण परदेशी यांनी हा निर्णय घेतला आहे. नव्या सीईओची नियुक्ती होईल, तो पर्यंत उपकार्यकारी अधिकारी महेश मोरोने या प्रकल्पाचे काम बघणार आहेत.

महापालिका आयुक्त तुकाराम मुंढेंना झटका; स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट प्रकल्पात सीईओ पदावरून हटवले

तुकाराम मुंढे नागपूर महानगर स्मार्ट सिटी प्रोजेक्टचे सीईओ नसताना देखील त्यांनी सीईओ पदाची सूत्रे आपल्या हातात घेतली. त्यानंतर त्यांनी खासगी कंत्राटदारांना फायदा होईल, असे निर्णय घेतल्याचा आरोप महापौर संदिप जोशी यांनी केला होता. त्यावरून आज मुंढे यांना स्मार्ट सिटी प्रोजेक्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरुन हटवण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे विरुद्ध महापौर संदीप जोशी असा वाद रंगला आहे. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्पात बेकायदेशीर कारभार केल्याचा आरोप करत महापौर संदीप जोशी यांनी सदर पोलीस ठाण्यात जाऊन या संदर्भात तक्रार देखील केली होती. त्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुद्धा तुकाराम मुंढे यांच्या कारभारावर नाराजी व्यक्त करत केंद्र सरकारकडे तक्रार केली होती.

तुकाराम मुंढे यांनी बेकायदेशीरपणे आणि असंवैधानिकपणे स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे हाती घेतल्याचे तक्रारींमध्ये नमूद करण्यात आले होते. त्यानंतर आज पहिल्यांदा झालेल्या स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या बैठकीत हा मुद्दा उपस्थित झाला. तेव्हा संचालक प्रवीण परदेशी यांनी तुकाराम मुंढे यांना कधीही स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची सूत्रे घेण्याचे आदेश लेखी किंवा मौखिक दिले नसल्याचे स्पष्ट केले. त्यानंतर मात्र मुंढे यांची कोंडी झाल्याचे स्पष्ट दिसून आले.

आजच्या बैठकीत महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांना स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट प्रकल्पाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून हटवण्याचा निर्णय घेण्यात आला. एका प्रकारे हा मुंढे यांना मोठा झटका मानला जात आहे. आता या संपूर्ण प्रकरणाची न्यायिक चौकशी व्हावी, यासाठी कायदेतज्ज्ञ मंडळींशी चर्चा करून पुढील बैठकीत कारवाईचा प्रस्ताव ठेवणार असल्याचे देखील संदीप जोशी यांनी स्पष्ट केले आहे.

Last Updated : Jul 10, 2020, 5:30 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.