नागपूर - नागपुरात रेमडेसिवीरचा मोजकाचा साठा उपलब्ध होत आहे. यामुळे सततचा वापर होत असल्याने रेमडेसिवीरचे नाव सर्वांना माहीत आहे. यामुळे रुग्ण बरा होण्यासाठी आग्रह करू लागले आहेत. काही प्रमाणात डॉक्टरांकडून सुद्धा याचा वापर अधिक होताना दिसून येत आहे.
दरम्यान, गरज असणाऱ्या रुग्णाना यांचा फायदा व्हावा यासाठी गौरवापर कमी झाला पाहिजे. यामुळे रुग्ण किंवा कुटुंबियांनी आग्रह करू नये. रुग्णालयांनी सुद्धा याचा उपयोग इ आणि एफ वर्गातील रुग्णांसाठीच करावा. जेणेकरून तुटवडा असतांना योग्य रुग्णांना ते मिळू शकले. यासाठी वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टरांशी चर्चा करण्यात आली आहे.
याबाबत योग्य माहिती देणारा व्हिडीओ जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी तयार केला आहे. यामध्ये आयएमएच्या अध्यक्षा अर्चना कोठारी आणि विदर्भ हॉस्पिटल असोसिएशन डॉ अनुप मरार यांनी नागरिकांना आवाहन केले आहे.
हेही वाचा- मुख्यमंत्र्यांची भूमिका कडक लॉकडाऊनची, मात्र... - चंद्रकांत पाटील