नागपूर - कोरोनावर एकमेव रामबाण उपाय म्हणजे लसीकरण आहे. यातच नागपूर जिल्ह्यात 18 वर्षावरील लसीकरण मोहिमेला सुरवात झाली आहे. लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळतांना दिसून येत आहे. एकाच दिवसात नागपूर शहर आणि ग्रामीणमध्ये 41 हजार 881 जणांचे विक्रमी लसीकरण झाले आहे.
बुधवारी आलेल्या अहवालात नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात 18 हजार 18 नागरिकांनी लस घेतली. तेच शहरातील मनपाच्या हद्दीत 22 हजार 221 नागरिकांनी विविध केंद्रावर लस घेतली. तर खासगी हॉस्पिटलमध्ये 1 हजार 482 अशा एकूण 23 हजार 703 नागरिकांनी लस घेतली आहे. जिल्हा व महानगरपालिका आरोग्य यंत्रणेने नागरिक मोठ्या संख्येने लसीकरणात सहभागी होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. जिल्ह्यातील लसीकरण लवकर पूर्ण व्हावे यासाठी आरोग्य यंत्रणा प्रयत्न करीत आहे. लस ही सुरक्षित आहे. याबाबतचे गैरसमज टाळावे स्वतःचा जीवाच्या रक्षणासाठी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहन आरोग्य यंत्रणेने केले जात आहे.
हेही वाचा-कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला कारणीभूत ठरणार 'डेल्टा व्हेरीएन्ट'? रत्नागिरी, जळगावात सर्वाधिक रुग्ण
दुसऱ्या लाटेनंतर गैरसमज दूर झाल्याने गती...
लसीकरणाच्या बाबतीत गैरसमज होते. पण दुसऱ्या लाटेततील अनुभवानंतर लसीकण झालेल्या रुग्णांच्या अनुभवानंतर सकारात्मक बदल होताना दिसून येत आहे. या दुसऱ्या लाटेत अनेकांनी कोरोना बाधित होऊन मृत्युमुखी पडताना जवळून बघितले आहे. यामुळे लसीकरण करणे हा उत्तम पर्याय आता शहरासह ग्रामीण भागात स्वीकारण्यास सुरवात झाली आहे. तरुण मोठ्या संख्येने लसीकरण केंद्रावर पोहोचल्याचे दिसून आले.
हेही वाचा-तोतया आयएएस अधिकाऱ्याकडून बोगस लसीकरणाचे रॅकेट; खासदाराची फसवणूक झाल्यानंतर भांडाफोड
शहर आणि ग्रामीण भागात लसीकरण केंद्र सुरू...
केंद्र सरकारच्या घोषणेनंतर 18 ते 44 वयोगटातील लसीकरणाला पुन्हा महाराष्ट्रात सुरूवात झाली. त्यानुसार गेल्या आठवडयात राज्य सरकारने 30 ते 44 गट निश्चित केला होता. आजपासून 18 वर्षावरील लसीकरणाला सुरुवात झाली. नागपूर जिल्ह्यामध्ये 53 प्राथमिक आरोग्य केंद्र, 10 ग्रामीण रुग्णालय 2 उपजिल्हा रुग्णालय आहे. तर मनपा व शासकीय रुग्णालयाच्या एकूण 106 केंद्रावर शहरात लसीकरण सुरू आहे.