नागपूर - अर्थमंत्री निर्मला सीतारमन ( Finance Minister Nirmala Sitaraman ) यांनी सादर केलेल्या बजेटचे कौतुक करत हे सर्वसामान्यांचे बजेट असल्याचे असल्याची प्रतिक्रिया सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले ( Minister Ramdas Athavle ) यांनी दिली आहे. तसेच तत्कालीन युपीए सरकारच्या बजेशी तुलना करत काँग्रेसवर ( Ramdas Athavle Critisized Congress ) जोरदार टीकाही त्यांनी केली. ते नागपुरात रवीभवन येथे आयोजित पत्रकार परिषदेत ( Ramdas Athavle Ravibhavan PC ) बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( CM Udhav Thackeray ) यांना शिवसेना बाळासाहेबांच्या विचारावर टिकवायची असेल, तर काँग्रेस-राष्ट्रवादीचा नाद सोडून भाजपसोबत पुन्हा युती करावी. अडीच वर्षाच्या फॉर्मूल्यानुसार मुख्यमंत्री ठाकरे यांनी राजीनामा देऊन देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadnavis ) यांना मुख्यमंत्री करावे, असे आवाहनही केले.
तर शिवसनेना भाजपसोबत येऊ शकते -
महाराष्ट्रात आगामी काळात होऊ घातलेल्या महानगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये रिपाई पक्ष हा भाजप सोबत असणार आहे. यातच मुंबईमध्ये जे महानगरपालिकेची निवडणूक होईल त्यात इतिहास रचला जाणार आहे. ज्यापद्धतीने 1992 मध्ये काँग्रेसला रिपाईने पाठिंबा दिल्याने सत्ता आली आणि रिपाईचे पहिले महापौर चंद्रकांत हंडोरे यांची निवड झाली होती. त्याच धर्तीवर भाजप आणि रिपाईला याचा यंदाच्या निवडणुकीत फायदा होऊन मुंबई महानगरपालिकेत असलेल्या 236 जागेपैकी 125 पर्यंत जागा मिळवण्याचा प्रयत्न असणार आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना, मनसे हे चारही पक्ष वेग वेगळे लढत आहे. त्यामुळे याचा फायदाही भाजप-रिपाई या महायुतीला होणार असल्याचे आठवले म्हणाले. महानगरपालिकेत शिवसेना पराभूत झाल्यास स्वतःहून भाजपमध्ये येण्याची शक्यता अधिक आहे, असेही भाकीत रामदास आठवले यांनी केले.
हेही वाचा - Shivaji Park PIL : शिवाजी पार्कवर स्मृतिस्थळ न बनवण्यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका