ETV Bharat / city

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न द्या - प्रवीण तोगडिया

बाळासाहेब ठाकरे, अशोक सिंघल, महंत रामचंद्र परमहंस, गोरख मठाचे महंत अवैधनाथ या नेत्यांना भारतरत्न देण्याची मागणी प्रवीण तोगडिया यांनी केली. ते नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

Pravin Togadia said Balasaheb Thackeray to give Bharat Ratna
बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्या - प्रवीण तोगडिया
author img

By

Published : Feb 5, 2020, 11:38 PM IST

नागपूर - बाळासाहेब ठाकरे, अशोक सिंघल, महंत रामचंद्र परमहंस, गोरख मठाचे महंत अवैधनाथ या नेत्यांचे राम मंदिर आंदोलनातील योगदान मोठे आहे. यामुळे या मोठ्या नेत्यांना भारत सरकारने भारतरत्न देऊन त्यांचा गौरव करावा, अशी मागणी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष परिषदेचे अध्यक्ष डॉ प्रवीण तोगडिया यांनी केली. ते नागपूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.

बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न द्या - प्रवीण तोगडिया

राम मंदिर आंदोलनाचे नेतृत्व करायला जेव्हा कुणी तयार नव्हते तेव्हा या नेत्यांनी नेतृत्व केले. या व्यक्तींना भारत सरकारने भारतरत्न द्यावा, अशी मागणी तोगडिया यांनी केली. सोबतच राम मंदिर उभारणीत शेकडो राम भक्तांचे रक्त व हजारो राम भक्तांच्या घामाचे श्रेय आहे. त्यामुळे सोमनाथ मंदिराच्या धर्तीवर अयोध्येतील राम मंदिर परिसरात बलिदान देणाऱ्या रामभक्ताचे स्मारक बनवण्याची मागणीही तोगडिया यांनी केली. भाजप जेव्हा एकटा पक्ष होता त्यावेळी केवळ शिवसेना त्यांच्यासोबत उभी होती. लहान भावाला मुख्यमंत्रीपद दिल्याने भाजप काही लहान झाला नसता, असेही प्रवीण तोगडिया यांनी भाजपला कानपिचक्या दिल्या. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जे लढतात मग ते कुठल्याही पक्षाचे नेते असोत, त्यांना माझे समर्थन असल्याचे प्रवीण तोगडिया म्हणाले. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे हिंदुत्वाचे कार्य करीत असल्याने माझे त्यांना समर्थन असल्याचे प्रवीण तोगडिया म्हणाले.

Intro:राम मंदिराच्या लढ्यात चार मोठ्या नेत्यांचं योगदान आहे, त्यामुळे या मोठ्या नेत्यांना भारत सरकारने भारतरत्न देऊन त्यांचा गौरव करावा अशी मागणी आंतरराष्ट्रीय हिंदू परिषदेचे अध्यक्ष डॉक्टर प्रवीण तोगडिया यांनी केली, ते नागपूरात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते...
Body:बाळासाहेब ठाकरे, अशोक सिंघल,अयोध्येचे महंत रामचंद्र परमहंस व गोरख मठाचे महंत अवैद्यनाथ या नेत्यांचे राम मंदिर आंदोलनात मोठे योगदान आहे... राम मंदिर आंदोलनाचे नेतृत्व करायला जेंव्हा कुणी तयार नव्हते तेंव्हा या नेत्यांनी नेतृत्व केलं... या व्यक्तींना भारत सरकारने भारतरत्न द्यावा अशी मागणी तोगडिया यांनी केली... सोबतच राम मंदिर उभारणीत शेकडो राम भक्तांचे रक्त व हजारो राम भक्तांच्या घामाचे श्रेय आहे... त्यामुळे सोमनाथ मंदिराच्या धर्तीवर अयोध्येतील राम मंदिर परिसरात बलिदान देणाऱ्या रामभक्ताचं स्मारक बनवण्याची मागणीही तोगडिया यांनी केली....भाजप जेंव्हा एकटा पक्ष होता त्यावेळी केवळ शिव सेना त्यांच्यासोबत उभा होता... लहान भावाला मुख्यमंत्री पद दिल्याने भाजप काही लहान झाला नसता असेही प्रवीण तोगडिया म्हणाले... हिंदुत्वाच्या मुद्द्यावर जे लढतात मग ते कुठल्याही पक्षाचे नेते असो त्यांना माझे समर्थन असल्याचं प्रवीण तोगडिया म्हणाले... राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे हिंदुत्वाचं कार्य करीत असल्याने माझं त्यांना समर्थन असल्याचं प्रवीण तोगडिया म्हणाले.

बाईट -- प्रवीण तोगडिया (अध्यक्ष, आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद)Conclusion:null
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.