ETV Bharat / city

Mission 30 : स्वतंत्र विदर्भाच्या आंदोलनात रणनीतीकार प्रशांत किशोर यांची उडी, म्हणाले...

देशातील तिसावे राज्य विदर्भ राज्य असावे, या मागणीसाठी आता राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर मैदानात उतरले (Prashant Kishor statement on Mission 30) आहे. आज प्रशांत भूषण हे नागपुरच्या दौऱ्यावर आहेत. विदर्भवाद्यांसोबतच राजकीय, सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील संपादकांसोबत एक महत्त्वपूर्ण बैठक घेत आहेत. यावेळी ते विदर्भाचा इतिहास आणि आंदोलनाची भूमिका समजून घेणार (Prashant Kishor on Vidarbha movement) आहेत.

Prashant Kishor
प्रशांत किशोर
author img

By

Published : Sep 20, 2022, 3:25 PM IST

नागपूर : देशातील तिसावे राज्य विदर्भ राज्य असावे, या मागणीसाठी आता राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर मैदानात उतरले (Prashant Kishor statement on Mission 30) आहे. आज प्रशांत भूषण हे नागपुरच्या दौऱ्यावर आहेत. विदर्भवाद्यांसोबतच राजकीय, सामाजिक आणि पत्रकारिता क्षेत्रातील संपादकांसोबत एक महत्त्वपूर्ण बैठक घेत आहेत. यावेळी ते विदर्भाचा इतिहास आणि आंदोलनाची भूमिका समजून घेणार (Prashant Kishor on Vidarbha movement) आहेत. त्यानंतर ते वेगवेगळ्या विदर्भाच्या आंदोलनाला कोणत्या दिशेने नेता येईल, याकरिता रणनीती आखणार आहेत.

आज दिवसभर अनेकांशी ते सामोरा-समोर बसून चर्चा करतील. त्यानंतर पुढील आठवड्यात ते पुन्हा नागपुरला येणार आहेत, त्यावेळी आपली भूमिका जाहीर करणार आहेत. मी केवळ समर्थन करू शकतो. माझे अनुभव सांगू शकतो जे काही करायचं आहे ते इथल्या लोकांना करायचे आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.

प्रतिक्रिया देताना राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर

प्रशांत किशोर यांची बैठक सुरू होण्याआधी वेगळ्या विदर्भाचे समर्थक आणि काँग्रेस नेते आशिष देशमुख यांनी मिशन ३० वे राज्य विदर्भ हे कॅम्पेनिंग सुरू केले आहे. देशात २९ राज्य असून ३० वे राज्य विदर्भ असावे, अशी मागणी त्यांनी उचलून धरली आहे. विदर्भाच्या आंदोलनाची भूमिका समजून घेण्यासाठी प्रसिद्ध राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या नेतृत्वात नागपूरच्या चिटणवीस सेंटरमध्ये विदर्भवाद्यांची महत्वपूर्ण बैठक सुरू झाली आहे. माझं काम केवळ रणनीती ठरवायचे आहे, यावर पुढील काम विदर्भवादयांनाचं करावे लागेल असे त्यांनी स्पष्ट केलं (Vidarbha movement) आहे.

प्रशांत किशोर यांची भूमिका - केल्या काही महिन्यांपासून विदर्भातील सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातील मंडळीनी माझी भेट घेऊन विदर्भाच्या आंदोलन दिशा देण्यासाठी रणनीती आखावी असा आग्रह धरला होता. त्यामुळे माझी त्यांच्यासोबत झूम मिटिंग देखील झाली होती. आज मी केवळ त्यांना भेटण्यासाठी, ऐकण्यासाठी आणि ओळख करून घेण्यासाठी आलेलो आहे. त्यांच्या भावना, त्यांच्या आयडिया आणि त्यांना कळलेला विदर्भ कसा आहे, हे जाणून घेण्यासाठी आलो असल्याची माहिती प्रशांत किशोर यांनी दिली आहे.

छोटे राज्य म्हणून विदर्भकडे बघणे अयोग्य - विदर्भाची भौगोलिक, सामाजिक, आर्थिक परिस्थिती जाणून घेणे महत्त्वाचे आहे. इथे १० खासदार आणि ६० पेक्षा अधिक आमदार आहेत. विदर्भ छोटा राज्य होणार नाही. विदर्भाला स्वतःची वेगळी ओळख आहे. सर्व परिस्थिती जाणून घेतल्यानंतर यासंदर्भात भूमिका मांडणे योग्य होईल, असं प्रशांत किशोर म्हणाले (Prashant Kishor statement) आहेत.

प्रशांत किशोरच्या टीमकडून विदर्भात सर्वे - गेल्या दोन महिन्यांपासून प्रशांत किशोर यांच्या टीमच्या सदस्यांनी विदर्भातील अकरा जिल्ह्यात सर्वे केला आहे. या सर्वेचा अहवाल प्रशांत किशोर यांना सोपविण्यात आला आहे. त्यानंतरचं प्रशांत किशोर विदर्भाच्या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.