ETV Bharat / city

प्रशांत किशोर यांची राहुल गांधींवर अप्रत्यक्ष टीका, म्हणाले भारत जोडो यात्रेची सुरूवात गुजरातमधून करायला पाहिजे होती - Rahul Gandhi

काँग्रेसने आपली भारत जोडो यात्रा गुजरातमधून सुरू केली असती तर अधिक फायदा झाला असता. गुजरातमध्ये या वर्षाच्या अखेरीस निवडणुका होणार आहेत. त्यामध्ये काँग्रेसला फायदा झाला असता. किंवा उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशसारख्या भाजपशासित राज्यांमधून त्यांनी ही भारत जोडो यात्रा सुरू करायला पाहिजे होते असे मत प्रशांत किशोर यांनी व्यक्त केले.

प्रशांत किशोर यांची राहुल गांधींवर अप्रत्यक्ष टीका

author img

By

Published : Sep 20, 2022, 8:10 PM IST

नागपूर - सत्तेची 'भारत जोडो यात्रा' गुजरात किंवा भाजपशासित राज्य सुरू व्हायला हवी होती, असे मत राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी व्यक्त केले. येथे एका कार्यक्रमाचे आयोजन करताना ते बोलत होते.

काँग्रेसला फायदा झाला असता - यावेळी प्रशांत किशोर म्हणाले की, काँग्रेसने आपली भारत जोडो यात्रा गुजरातमधून सुरू केली असती तर अधिक उपयोगी झाले असते. गुजरातमध्ये या वर्षाच्या अखेरीस निवडणुका होणार आहेत. त्यामध्ये काँग्रेसला फायदा झाला असता. किंवा उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेशसारख्या भाजपशासित राज्यांमधून त्यांनी ही भारत जोडो यात्रा सुरू करायला पाहिजे होते असे मत किशोर यांनी व्यक्त केले.

राहुल गांधी यांच्या यात्रेला प्रतिसादही चांगला - राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील यात्रेची सुरुवात तामिळनाडूतून झाली. राहुल गांधी यांच्या यात्रेला प्रतिसादही चांगला मिळत आहे. त्याचवेळी विशेष म्हणजे, प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये सामील होणार असल्याची चर्चा या वर्षाच्या सुरुवातीला होती. पण नंतर त्यांनी सांगितले की त्यांनी निवडणुकीची रणनीती आखण्याची ऑफर नाकारली आहे. मात्र वेगवेगळ्या राजकीय नेत्यांना मात्र प्रशांत किशोर भेटत आहेत.

विदर्भाच्या समर्थकांशी संवाद - नागपूरमध्ये वेगळ्या विदर्भाच्या समर्थकांशी संवाद साधताना त्यांनी वेगळ्या राज्याचे स्वप्न साकार करण्यासाठी तेथील जनतेने एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. भाजपचे माजी आमदार आशिष देशमुख यांनी विदर्भाला राज्याचा दर्जा मिळवून देण्यासाठी रणनीती तयार करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. त्यावेळीही त्यांनी विदर्भवाद्यांशी संवाद साधला. लोकांना आशा असेल तर वेगळ्या विदर्भ राज्याचा विचार पुढे करता येईल, असे किशोर म्हणाले. ते पुढे म्हणाले की, आंदोलन केंद्रापर्यंत पोहोचले पाहिजे. त्याचा राष्ट्रीय प्रभाव असला पाहिजे. मोहीम समाजातून उदयास आली पाहिजे, तरच ती परिणामकारक होते. आता आपण राजकीय रणनीतीकार म्हणून काम करणे थांबवले आहे. कोणत्याही पक्षासाठी नाही तर लोकांसाठी काम करायचे आहे, असे किशोर यांनी यावेळी स्पष्ट केले.

विदर्भ कसा आहे - गेल्या काही महिन्यांपासून विदर्भातील सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय क्षेत्रातील मंडळीनी भेट घेतल्याचे किशोर यांनी सांगितले. विदर्भाच्या आंदोलनाला दिशा देण्यासाठी रणनीती आखावी असा आग्रह त्यांनी धरला होता. त्यांच्यासोबत झूम मिटिंग देखील झाली होती अशी माहितीही किशोर यांनी दिली. आज मी केवळ त्यांना भेटण्यासाठी, ऐकण्यासाठी आणि ओळख करून घेण्यासाठी आलेलो आहे. त्यांच्या भावना, त्यांच्या आयडिया आणि त्यांना कळलेला विदर्भ कसा आहे, हे जाणून घेण्यासाठी आलो असल्याची माहिती प्रशांत किशोर यांनी दिली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.