ETV Bharat / city

'राज्याचे दोन मंत्री अरविंद बनसोड संशयास्पद मृत्यू प्रकरणात हस्तक्षेप करण्याच्या प्रयत्नात'

author img

By

Published : Jun 18, 2020, 8:14 PM IST

Updated : Jun 18, 2020, 8:57 PM IST

अरविंद बनसोड मृत्यू प्रकरणाला प्रभावित करण्याचा प्रयत्न करत असल्याचा ही गंभीर आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.

nagpur
घटनेची माहिती घेताना प्रकाश आंबेडकर

नागपूर - राज्य सरकारचे दोन मंत्री अरविंद बनसोड मृत्यू प्रकरणात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न करत असल्याचा गंभीर आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणीही प्रकाश आंबेडकर यांनी केली. या प्रकरणाच्या चौकशी अधिकाऱ्यांच्या निलंबन करण्यात यावे, असेही ते माध्यमांशी बोलताना म्हणाले.

'राज्याचे दोन मंत्री अरविंद बनसोड संशयास्पद मृत्यू प्रकरणात हस्तक्षेप करण्याच्या प्रयत्नात'

या प्रकरणात अॅट्रॉसिटी प्रकरण दाखल झाल्यानंतर सरकारकडून देण्यात आलेली नुकसानभरपाई ही कमी आहे. शिवाय त्यासाठीचा चेक पीडित कुटुंबाला द्यायला राज्य सरकारचे दोन मंत्री गेले होते. हे एका प्रकारे पीडित कुटुंबावर दबाव आणण्याचा प्रकार असल्याची टीकाही प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. नितीन राऊत व गृहमंत्री अनिल देशमुख हे या प्रकरणात हस्तक्षेप करत असल्याचा आरोप आंबेडकर यांनी केला. सोबतच या प्रकरणातील मुख्य साक्षीदार राऊत हा वेळोवेळी जबाब बदलत असल्याने त्याला आरोपी बनवावे अशीही मागणी आंबेडकर यांनी केली आहे.

काय आहे प्रकरण . . . . .

अरविंद बनसोड हा नरखेड तालुक्यातील थडीपवनी या गावातील मागासवर्गीय तरुण स्पर्धा परिक्षेचा अभ्यास करत होता. गॅस एजन्सीचा फोटो काढत असताना एजन्सी संचालक मयूर उमरकरशी त्याचा २७ मे रोजी वाद झाला. वादातून मारहाण केल्यानंतर अरविंद तेथून निघून नजीकच्या बँकेत आला. त्या ठिकाणीही अरविंद बनसोडला मयूर उमरकर आणि त्याच्या साथीदारांनी मारहाण केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. त्यानंतर अरविंदचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळून आला. यावेळी मयूरनेच अरविंदला मारल्याचा आरोप अरविंदच्या कुटुंबीयांनी केला. या प्रकरणातील मुख्य आरोपी मयूर उमरकर हा राष्ट्रवादीचा पंचायत समिती सदस्य आहे. त्यामुळे पोलीस त्याला वाचवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

Last Updated : Jun 18, 2020, 8:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.