नागपूर - खासगीकरणाच्या धोरणा विरोधात आजपासून (सोमवारी) राज्यातील वीज मंडळाच्या कर्मचाऱ्यांनी ( Power Board Employees Strike ) दोन दिवस काम बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे. नागपूरच्या विद्युत भवन ( Vidyut Bhavan Nagpur ) परिसरात शेकडो कर्मचाऱ्यांनी शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. कोणत्याही परिस्थितीत राज्य सरकारचा खासगीकरणाचा डाव यशस्वी होऊ देणार नसल्याची भूमिका आंदोलन कर्मचाऱ्यांनी घेतली आहे. वीज कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला घाबरून राज्य सरकारने मेस्मा कायदा लागू केलेला आहे. हे अत्यंत हास्यास्पद असल्याचे मत कर्मचाऱ्यांनी त्यांनी व्यक्त केले आहे.
कर्मचाऱ्यांच्या प्रमुख मागण्या : महावितरण, महापारेषण आणि महानिर्मितीमध्ये सुरू असलेले खासगीकरण तत्काळ थांबवण्यात यावे, केंद्र सरकारच्या विद्युत संशोधन बिलला विरोध, सर्व कंत्राटी आणि आऊटसोर्सिंग कर्मचाऱ्यांना वयाच्या 60 वर्षापर्यंत नोकरीत संरक्षण देण्यात यावी, महाराष्ट्रातील जलविद्युत केंद्रे खासगी उद्योजकांना देण्यास विरोध करण्यात आला आहे. तिन्ही कंपन्यांमध्ये कर्मचारी भरती होत असलेला विलंब विरोधात संप करण्यात आला आहे.
हेही वाचा - Minister Nitin Raut Statement Nagpur : 'कोणत्याही परिस्थितीत महाराष्ट्र अंधारात जाऊ देणार नाही'