ETV Bharat / city

संतापजनक! देवाची अवकृपा झाली म्हणत दोन भोंदू बाबाचा अल्पवयीन मुलीवर बलात्कार - nagpur rape case

17 वर्षीय मुलीची प्रकृती बरोबर राहत नसल्याने तिच्यासाठी पूजा करण्याचा सल्ला दिला. यात पीडितेला विवस्त्र करून पूजेच्या नावावर बलात्काराची घटना 3 मे रोजी रात्री उघडकीस आली. पीडितेच्या मामाला दिसताच दोघांनी पळ काढला.

सावनेर पोलीस नागपूर
सावनेर पोलीस नागपूर
author img

By

Published : May 5, 2022, 9:57 AM IST

नागपूर - देवाची अवकृपा झाली म्हणत पूजा करण्याचे सांगून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या दोन भोंदूबाबांना सावनेर पोलिसांनी अटक केली. 17 वर्षीय मुलीची प्रकृती बरोबर राहत नसल्याने तिच्यासाठी पूजा करण्याचा सल्ला दिला. यात पीडितेला विवस्त्र करून पूजेच्या नावावर बलात्काराची घटना 3 मे रोजी रात्री उघडकीस आली. पीडितेच्या मामाला दिसताच दोघांनी पळ काढला. मनोहर कोल्हे (वय, ५५ रा. हेटी) आणि युवराज सोनटक्के (वय ४० रा. पहेलापार) असे अटकेतील भोंदू बाबाचे नाव आहे.

संधीचा घेतला फायदा - 17 वर्षीय पीडितेची मागील अनेक दिवसांपासून तब्येत खराब राहत होती. गावात राहणाऱ्या एका मंदिरात पुजारी म्हणून वावरत असलेल्या युवराज सोनटक्के नामक व्यक्तीला याची माहिती मिळाली. त्याने ही संधी हेरून त्या पीडित कुटुंबाला भेटून पूजा पाठ करण्याचा सल्ला दिला. तसेच यासाठी माझ्या परिचयाची एक व्यक्ती आहे. ते पोहोचलेले महाराज असून मनोहर कोल्हे त्यांचे नाव आहे. ते हेटीत राहतात. आपण त्यांच्याकडे जाऊन पूजापाठ करू, असे पीडित मुलीच्या कुटुंबियांना सांगून पीडितेच्या मामाचे मन परिवर्तन केले.

हेही वाचा - OBC Reservation : ओबीसी आरक्षणाचा निकालानंतर मुख्यमंत्र्यांनी बोलवली मविआ नेत्यांची बैठक!

...अन् प्रकार आला उघडकीस - 3 मे रोजी रात्री पीडित मुलीला मनोहर कोल्हे नामक महाराजाच्या हेटी येथील घरी नेले. तेथे पूजापाठ करण्याची तयारी केली. रात्री साडे 9 वाजताच्या सुमारास पूजा सुरू करत मुलीला विवस्त्र केले आणि त्यानंतर पीडित मुलीचा अंगावर गुलाल टाकला. त्यानंतर मामाला सांगितले उद्या सकाळी पूजा संपेल सकाळी येऊन जा. दरम्यान मामा घराच्या दिशेने निघाले. परंतू फुलांचा हार घेऊन जाण्यासाठी मामा परत आला. तेव्हा दोघेही भोंदू बाबा तिच्यावर सामूहिक बलात्कार करताना दिसले. त्यामुळे संतप्त मामाला पाहून दोघांनीही पळ काढला. या सगळ्या प्रकाराविरोधात सावनेर पोलिसात तक्रार दिली. पीडित मुलीला वैद्यकिय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आले. दोन्ही भोंदू बाबांवर गुन्हा दाखल करत अटक करण्यात आली. पुढील तपास एपीआय सोनाली रासकर करत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.