नागपूर - शहरातील भंडारा मार्गावर असलेल्या पारडी परिसरातील निर्माणाधिन उड्डाणपूलाच काही भाग कोसळला आहे. दरम्यान, या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. टनास्थळी कळमना आणि पारडी पोलिसांच्या पथकाने सर्व दक्षता घेतली आहे. तसेच, येथील वाहतुकीची कोंडी सोडवण्याचे काम केले आहे. तसेच, या घटनेबाबात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने एक चौकशी समिती गठीत केली आहे. या चौकाशीचा अहवाल आल्यानंतर दोषी कंत्राटदारांवर कारवाई करणार असल्याचे प्राधिकरणाने स्पष्ट केले आहे.
वाहतुकीची कोंडी देखील सोडवण्यात आली
राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून या पुलाचे काम सुरू आहे. हे काम गेल्या सात वर्षांपासून सुरू आहे. मात्र, पुलाच्या निर्माणाचे कार्य अतिशय संथ गतीने सुरू असल्याने या भागात नेहमीच वाहतूक कोंडी तयार होते. आज पुलाच्या दोन पिलरवर गर्डर टाकण्याचे कार्य सुरू असताना मशीनचे संतुलन बिघाल्याने गर्डरचा एक भाग खाली कोसळला ज्यामुळे हा अपघात झाला. मात्र, सुदैवाने या अपघातात कुणालाही ईजा झालेली नाही. पुलाचा भाग कोसळून अपघात झाल्याची माहिती परिसरातील लोकांना समजताच हजारो लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन गर्दी केली होती.
अनेक अपघातांसाठी कारणीभूत ठरला आहे हा पूल
गेल्या सात वर्षांपासून पार्टीच्या उड्डाणपुलाचे काम राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून केले जात आहे. मात्र, कामाची गती अतिशय संथ असल्यामुळे या भागात अनेक अपघात होऊन अनेकांना आपला जीव देखील गमवावा लागला आहे.
केंद्रीय मंत्री गडकरींना बसला होता वाहतूक कोंडीचा फटका
संपूर्ण देशात दर्जेदार रस्त्यांची निर्मिती करून वाहतुकीचा मार्ग सुकर करण्याचे काम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनाही वाहतूक कोंडीला समोर जावं लागलं होत. १९ जून रोजी नितीन गडकरी या मार्गाने जात असताना त्यांच्या वाहनांचा ताफा देखील या पुलाच्या निर्माण कार्यामुळे अडकला होता
हेही वाचा - बुधवारी दहावी- बारावी पुरवणी परीक्षेचा निकाल होणार जाहीर; असा पाहा निकाल!