नागपूर : देश स्वातंत्र्याची चळवळीची सुरुवात 1857 मध्ये झालेल्या उठावापासून झाली होती. पण, स्वातंत्र्य मिळायला बराच काळ लागला. या काळात अनके स्वातंत्र्य सैनिकांनी देशाप्रती आपले कर्तव्य पूर्ण करण्यासाठी कार्य करीत प्राणाची आहुती दिली. यातील एक नाव म्हणजे डॉ पांडुरंग खानखोजे ( Dr. Pandurang KhanKhoje ) हे आहे. आजोबा तात्याजी खानखोजे ( Tatyaji Khankhoje ) यांच्यापासून क्रांतीचे बालकडून बालवयात मिळाले. पण, ब्रिटिशांपासून लपून केलेले कार्य जनसामान्यांपासून तेवढेच दूर राहिले. पण, स्वातंत्राच्या ( Indian Independence Day ) अमृत महोत्सवाचे निमित्त ( Amrit Mahotsav of Independence ) आपण हे सगळे जाणून घेऊया ईटीव्ही भारताच्या विशेष रिपोर्टमधून...
डाॅ. खानखोजेंचे बालपण : पांडुरंग सदाशिव खानखोजे यांचा जन्म तत्कालीन पालकवाडी म्हणजेच स्वातंत्र्य लढ्यातील राजधानी राहिलेल्या वर्ध्यात 7 नोव्हेंबर 1884 रोजी जन्म झाला. त्यांचे आजोबा तात्याजी खानखोजे यांनी 1857 चा उठावात सहभाग घेतला. त्यामुळेच ते ब्रिटिशांच्या रडारवर आले. त्यांनी नागपुर जिल्ह्यातील काटोल सोडून वर्ध्यात मुक्काम हलवला. इथेच पांडुरंगाने तात्याजी कडून अनेक क्रांतिकारक लढ्यातील कथा ऐकत ब्रिटीश सरकार विरुद्ध भावना तयार झाली. त्यामुळे त्याचे परिणामही बालवयात दिसून आले. वर्ध्यात प्राथमिक शिक्षण घेतानाच पांडुरंग खानखोजे यांनी बाल समाज नावाची संघटनां स्थापन केली होती.
शालेय जीवनापासून क्रांतिकारक लढा : त्याद्वारे इंग्रजांविरुद्ध विरोध करायला सुरुवात केली होती. 1903 मध्ये ते वर्धा सोडून नागपूरला काकांकडे आले तिथे त्यानी निलसिटी हायस्कूलमध्ये शिक्षण घ्यायला सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी श्री समर्थ शिवाजी समाजाची स्थापना केली. त्यावेळी त्यांना ब्लॅक लिस्ट करत इंग्रजांनी नजर ठेवायला सुरवात केली. दरम्यान, इंग्लंडच्या सातव्या ऍडव्हर्टच्या राज्याभिषेक समारंभ साजरा करण्याचा सरकारी आदेश आल्याने. शाळेत खूप नवीन कपडे घालवण्याचे आदेश दिले. पण डॉ. खानखोजींनी त्या वेळेस आपल्या सहकाऱ्यांना सांगितले की हा आपल्यासाठी दुःखाचा दिवस आहे. त्यामुळे दुसऱ्या दिवशी जेव्हा पेढे वाटत होते. त्यावेळी खानखोजे यांनी विरोध करत पेढे फेकून दिले. पण वंदे मातरमचा नारा लावत सगळ्यांना हादरून सोडले. काहींना ब्रिटनाशी पकडले पण त्यातही ते इंग्रजांच्या सैन्याला तुरी देत निसटले.
परदेशात जाऊन दिला क्रांतिकारक लढा : 1906 मध्ये लोकमान्य टिळकांच्या सांगण्यावरून त्यांनी देशाबाहेर जाऊन ब्रिटिश सरकार विरोधात कार्य सुरू केले. लष्करी शिक्षण घेऊन शस्त्र बॉम्ब तयार करण्याचे प्रशिक्षण घेण्यास सांगितले. सुरवातीला जपानला त्यानंतर मजूर बनून अमेरिकेला पोहोचले. अमेरिकेत कृषी विद्यापीठात संशोधनला सुरवात केली. १९९४ ला त्यांनी कृषिशास्त्रात पीएचडी केली. 'गहू' या पिकावर संशोधन केले. त्यानंतर मेक्सिकोत गेले. त्यांनी महत्वाचे समजले जाणारे मक्याच्या पिकात संशोधन करून वर्षभर येणारे हायब्रीडचे वाण शोधून काढले. मेक्सिकोत घडवून आणलेल्या कृषी क्रांतीमुळे त्यांना मेक्सिकोचे राष्ट्राध्यक्ष यांच्या रांगेत फोटोला स्थान दिले असून त्याना 'गरिबांचा अन्नदाता' अशी ओळख दिली. यावरून त्यांच्या कृषी कार्यातील योगदान आपण लक्षात घेऊ शकतो.
ब्रिटीशांशी दिला लढा : लहानपणी शाळेत शिकत असताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल चुकीच्या पद्धतीने केलेल्या लिखाणाचा विरोध करत पुस्तक फाडले. पुढल्या काळात त्यांनी शिवाजी महाराजांच्या गनिमीकावा युद्धनिती आधार घेत गदर संघटनेचे काम पांडुरंग खानखोजे यांनी केले होते. त्यांनी देश स्वातंत्र्य चवळीच्या कार्यात स्वतःला वाहून घेतले. वायव्य सरहद्द प्रांत आणि पूर्वांचल ही गदर सेनेच्या आक्रमणाची लक्षकेंद्रे होती. त्यावेळी त्यांनी बलिदानास सदैव सज्ज असे क्रांतिकारकांचे सामूहिक नेतृत्व गदरला लाभले होते. पहिले महायुद्ध सुरू झाल्यानंतर ब्रिटीशांच्या विरोधात सेनापती म्हणून डॉ. खानखोजे यांनी सैन्याचे नेतृत्व केले. जोमाने लढा देऊन ब्रिटिश सैन्यापुढे पराभव झाला. इंग्रजांनी स्वतंत्र्य सैनिक फासावर लटकवले. यात खानखोजे हे निसटण्यात यशस्वी झाले म्हणून स्वतंत्र भारतात ते येऊ शकले.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर आले देशात : अखेर ब्रिटिश गुलामगिरीत गेले ते परतले भारत स्वातंत्र्य झाल्यावरच स्वतंत्र भारतात ५ मे १९४९ रोजी शेती सुधार कमिटीची स्थापना केली.. मध्यप्रदेशचे तात्कालीन कृषिमंत्री रा. कृ. पाटील यांनी डॉ. खानखोजे यांना समितीचे अध्यक्ष केले. दोन वर्ष त्यांनी देशभरात फिरून शेती सुधार कमिटीचे जुलै १९५१ मध्ये ४३४ पानांचा सुधारणा अहवाल सादर केला. भारताच्या सीमेवरील भागात सैनिकांच्या वसाहती शेती इत्यादी शिफारसी केल्या आहे. त्यावेळी त्यांनी सल्लागारपदी झालेली नेमणूक नंतर १९५६ ते १९६४ पर्यंत आकाशवाणी वरून शेती विषयक माहिती दिली. पण पाहिजे त्या प्रमाणात त्याचा ज्ञानाचा फायदा देशाला झाला ते भारताला झाला नाही. तसे झाले असते तर आज स्वातंत्र्य भारतात बळीराजाची परिस्थिती नक्कीच वेगळी असती असे मत नूतन भारत विद्यालयाच्या प्राचार्या तथा असे होते डॉ. खानखोजे या पुस्तकाच्या लेखिका डॉ. वंदना बडवाईक यांनी ईटीव्ही भारतशी बोलतांना व्यक्त केली.
हेही वाचा : धाडीत 390 कोटींचे घबाड पाहून प्राप्तिकर विभागाचे अधिकारी हैराण