ETV Bharat / city

दिलासा! नागपुरात 137.5 मेट्रिक टन ऑक्सिजनचासाठा उपलब्ध

जिल्ह्याला ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्याच्या दृष्टीने प्रशासनाने प्रयत्न वाढवले आहे. जिल्ह्यात रविवारी 137.58 मेट्रिक टन एवढा ऑक्सिजनचा साठा उपलब्ध झाला आहे. यामध्ये जिल्ह्याबाहेरून 78 मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध झाले आहे. अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिली आहे.

ऑक्सिजन
ऑक्सिजन
author img

By

Published : Apr 26, 2021, 1:44 AM IST

नागपूर - जिल्ह्याला ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्याच्या दृष्टीने प्रशासनाने प्रयत्न वाढवले आहे. जिल्ह्यात रविवारी 137.58 मेट्रिक टन एवढा ऑक्सिजनचा साठा उपलब्ध झाला आहे. यामध्ये जिल्ह्याबाहेरून 78 मेट्रिक टन ऑक्सिजन उपलब्ध झाले आहे. अशी माहिती विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी दिली आहे.

कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता रुग्णालयांना दररोज सरासरी 148 मेट्रिक टन ऑक्सिजनची गरज आहे. तसेच विभागातील इतर जिल्ह्यांना 50 टन ऑक्सिजनची आवश्यकता आहे. यानुसार विभागासाठी ऑक्सिजनचे नियोजन केले जात आहे. विभागातील तसेच शेजारच्या जिल्ह्यांना लगतच्या उद्योगातून जास्तीत जास्त ऑक्सिजन उपलब्ध करून देण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. अन्न व औषधी प्रशासनाचे नोडल अधिकारी सतीश चव्हाण यांच्यामार्फत जिल्ह्यातील आणि विभागातील रुग्णालयांना ऑक्सिजन पुरवठ्याचे वितरण करण्यात आले आहे.

नागपूर जिल्ह्यासाठी रविवारी 78 मेट्रिक टन ऑक्सिजनचा पुरवठा झाला आहे. हा पुरवठा आदित्य एअर प्लॅन्टमधून 42 मेट्रिक टन तर रेणुका येथून 36 मेट्रिक टन ऑक्सिजन प्राप्त झाले आहे. नागपूर जिल्ह्यात रविवारी सायंकाळपर्यंत 137.5 मेट्रिक टन ऑक्‍सिजनचा साठा उपलब्ध असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे नोडल अधिकारी सतीश चव्हाण यांनी दिली. नागपूर विभाग आणि जिल्ह्यासाठी 15 टँकर हे भिलाई येथील प्लॅन्टवरून मागवले जात आहे. भिलाईच्या टॅक्स एअर मार्फत बाहेरील राज्यातून टँकरद्वारा ऑक्सिजनचा पुरवठा होत आहे.

हेही वाचा - खुशखबर.. महाराष्ट्रातील १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांना कोरोना लस मिळणार मोफत

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.