ETV Bharat / city

Umesh Kolhe Murder Case : उमेश कोल्हे हत्या प्रकरणात नागपुरातून आणखी एकास अटक - उमेश कोल्हे हत्या प्रकरण

अमरावती शहराला हादरविणाऱ्या उमेश कोल्हे हत्या प्रकरणात ( Umesh Kolhe Murder Case ) अमरावती पोलिसांनी आणखी एका आरोपीला अटक केली आहे. शेख इरफान शेख रहीम (राहणार कमीला ग्राउंड अमरावती) असे या आरोपीचे नाव आहे. पोलिसांनी त्याला नागपूरमध्ये बेड्या ठोकल्या.

Umesh Kolhe Murder Case
Umesh Kolhe Murder Case
author img

By

Published : Jul 2, 2022, 10:35 PM IST

अमरावती - नुपूर शर्मा प्रकरणात सोशल मीडियावर उमेश कोल्हे ( Umesh Kolhe Murder Case ) यांनी पोस्ट शेअर केल्यामुळे त्यांची हत्या झाली असल्याचे अमरावती पोलिसांनी याआधीच स्पष्ट केले आहे. या प्रकरणात पोलिसांनी कालपर्यंत एकूण सहा जणांना अटक केली होती. आज या प्रकरणातील सातवा आरोपी शेख इरफान शेख रहीम (राहणार कमीला ग्राउंड अमरावती) याला नागपूर येथून अटक केली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

एन आय ए कडे तपास - या गंभीर प्रकरणाचा तपास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी एनआयएकडे दिला आहे. एनआयएचे पाच ते सहा झाडांचे पथक अमरावतीत दाखल झाले आहे. अमरावती पोलिसांकडून एनआयए रविवारी किंवा सोमवारी या संपूर्ण प्रकरणाचा तपास अधिकृतरित्या हाती घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी अमरावतीच्या पोलिस आयुक्त आरती सिंह यांनी गट बारा दिवसांपासून हे प्रकरण दडवून ठेवले असल्याचा आरोप केला होता. पोलीस आयुक्तांची देखील एनआयएकडून चौकशी व्हावी, अशी मागणी खासदार नवनीत राणा यांनी केली आहे.

हेही वाचा - Amravati Chemist Murder : उमेश कोल्हे प्रकरणाची गृहमंत्रालयाकडून दखल; तपास एनआयएकडे वर्ग

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.