नागपूर जीवनातील ४० वर्षांपेक्षा अधिक काळ प्रेस फोटोग्राफर म्हणून काम केल्यानंतर अनुभव समृद्ध झालेल्या एका जेष्ठ छायाचित्रकाराला ई-रिक्षा चालवून कुटुंबाचा गाडा हाकावा लागतो आहे. दत्तात्रय पुंडलिक हिवसे असे Photographer Dattatraya Hivse या जेष्ठ छायाचित्रकाराचे नाव आहे, आज त्यांचे वय ६५ असून त्यापैकी ४० वर्ष त्यांनी नागपूरच्या विविध प्रसार माध्यमांमध्ये छायाचित्रकार म्हणून काम केले आहे. मात्र, शेवटी पदरात काहीहीचं पडले नाही, त्यामुळे त्यांच्यावर आज ही बिकट परिस्थिती ओढावली आहे. परंतु परिस्थिती कठीण आली असली तरी दत्ता हिवसे डगमगले नाही. आजही ते अपार कष्ट करून वृद्ध आईसह संपूर्ण कुटुंबासाठी जबाबदारी समर्थपणे पार पाडत आहेत. जागतिक छायाचित्र दिनाच्या World Photography Day निमित्ताने दत्ता हिवसे यांचा संघर्षमय जीवन प्रवास कसा राहिला ते पाहू.
तरी जिद्द मात्र अजूनही कायम आहे १९७० ते ८० च्या दशकातील तो काळ होता, ज्यावेळी नागपूरचे प्रेस फोटोग्राफर Nagpur press photographer म्हणून दत्ता हिवसे उदयास आले होते. तो काळ होता ब्लॅक ऍण्ड व्हाईट फोटोग्राफीचा. त्यावेळी फोटोग्राफीला महागडा व्यासाय समजला जात होते. अश्या परिस्थितीत दत्ता हिवसे यांनी या क्षेत्रात काम करण्यास सुरुवात केली. ते इतिहासातील अनेक ऐतिहासिक घटनांचे जिवंत साक्षीदार आहेत. मग अटल बिहारी वाजपेयी, इंदिरा गांधी, मोररजी देसाई या सारख्या अनेक दिग्गज नेत्यांच्या नागपूरसह विदर्भ आणि मध्यप्रदेशात झालेल्या सभा आणि दौरे असतील त्या आपल्या कॅमेऱ्यात कैद करण्याचे काम दत्ता हिवसे यांनी त्याकाळी केले. जीवनात अनेक उतार चढाव आल्यानंतर देखील स्वतःच्या हिमतीने जीवन संघर्ष करणाऱ्या दत्ता हिवसे यांचे वय आज ६५ झाले असले तरी जिद्द मात्र अजूनही कायम आहे.
१९९९ साली कारगिल युद्धावेळी फोटो काढले फोटो दत्ता हिवसे यांनी वेगाने बदलत्या काळानुसार स्वतःला बदललेले. नवीन तंत्रज्ञानाचे कॅमेरे देखील विकत घेतले. मात्र, शेकडो पर्याय उपलब्ध झाल्यामुळे त्यांच्या प्रयत्नांना यश येऊ शकले नाही, त्यामुळे नाईलाजाने आज त्यांना ई-रिक्षा चालवून कुटुंबाचे पोषण करावे लागते. १९९९ साली कारगिल युद्ध सुरू असताना, संपूर्ण देश हायअलर्ट वर होता. त्यावेळी एक्सकल्यूसिव फोटोच्या नादात नागपूरच्या लोखंडी पुलावरून फोटो काढत होते. त्यावेळी लोखंडी पुलाच्या शेजारचा परिसर मिलिटरी अखत्यारीत येत असल्याने सैन्याच्या कर्मचाऱ्यांनी त्यांना ताब्यात घेऊन सलग 8 तास कसून चौकशी केली होती, त्या घटनेमुळे संपूर्ण जीवनचं बदलून गेल्याचे ते सांगतात.
मोबाईलमुळे फोटोग्राफीच्या केलेला उतरती कळा दत्ता हिवसे ज्या काळात फोटोग्राफी क्षेत्रात आले होते तेव्हा छायाचित्र आणि छायाचित्रकराला विशेष मान सन्मान होता. त्यावेळी ब्लॅक ऍण्ड व्हाईट फोटोसाठी दत्ता हिवसे हे एकमात्र विश्वसनीय नावं समजलं जायचं. मात्र हळूहळू काळ बदलत गेला. रोल कॅमेऱ्याची जागा डिजिटल कॅमेऱ्यांनी घेतली. आता तर घरोघरी मोबाईल फोटोग्राफर तयार झाल्याने फ्रोफेशनल फोटोग्राफरचे महत्व कमी होतं असल्याचं त्यांनी सांगितले आहे.
हेही वाचा Dahi Handi 2022 गोविंदा आला रे, महाराष्ट्रात दहीहंडीचा जाणून घ्या इतिहास
हेही वाचा World Photography Day 2022 जागतिक छायाचित्रण दिनाचा काय आहे इतिहास