ETV Bharat / city

Omicron In Nagpur : उपराजधानी नागपुरात ओमायक्रॉनच्या दुसऱ्या रुग्णाची नोंद, एम्समध्ये दाखल, प्रकृती उत्तम - दुबईवरून नागपूरला प्रवास

दुबईचा दौरा करून नागपूर शहरात दाखल झालेल्या व्यक्तीमध्ये कोरोनाचा ओमायक्रॉन व्हॅरिएंट आढळून ( Omicron Second Patient In Nagpur ) आला आहे. महानगरपालिका प्रशासनाने ( Nagpur Municipal Corporation Administration ) या माहितीला दुजोरा दिल्याने, नागपूरकरांच्या चिंतेत भर पडली आहे. तर पहिल्या रुग्णाला तीन दिवसातच रुग्णालयातून डिस्चार्ज मिळाला आहे.

Omicron In Nagpur
Omicron In Nagpur
author img

By

Published : Dec 23, 2021, 9:47 PM IST

नागपूर - उपराजधानी नागपुरमध्ये ओमायक्रॉनच्या दुसऱ्या रुग्णाची नोंद झाली ( Omicron Second Patient In Nagpur ) आहे. दुबईवरून आलेल्या 21 वर्षीय तरुणाचा ओमायक्रॉन अहवाल पॉझिटिव्ह आला असून, त्याच्यावर एम्समध्ये ( AIIMS Hospital Nagpur ) उपचार सुरू आहेत. रुग्णाची जीनोम सिक्वेन्सिंग चाचणी ( Genome Sequencing Test ) पॉझिटिव्ह आल्यानंतर त्यांना उपचारासाठी एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. महानगरपालिका प्रशासनाने ( Nagpur Municipal Corporation Administration ) ही माहिती दिली.

तरुणाची तब्येत उत्तम

ओमायक्रॉन बाधित रुग्ण हा 21 वर्षीय तरुण असून, तो 18 डिसेंबर रोजी दुबईवरून नागपूरला ( Dubai Tour ) परत आला होता. नागपूरला परत येताच त्याला विलगीकरण कक्षात पाठवण्यात आले होते. त्याठिकाणी त्या रुग्णाची कोरोना चाचणी करण्यात आली होती. त्याचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यामुळे त्याचा स्लॅब जीनोम सिक्वेन्सिंग करिता पाठवण्यात आला होता. आज त्या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने त्याला ओमायक्रॉन विषाणूंचे संक्रमण झाल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर आज त्याला उपचारासाठी एम्समध्ये दाखल करण्यात आले असून, त्याची तब्येत एकदम उत्तम असल्याची माहिती पुढे आली आहे.

पहिल्या रुग्ण तीन दिवसात डिस्चार्ज
१२ डिसेंबर रोजी ४० वर्षीय इसमाला ओमायक्रॉन विषाणूंचे संक्रमण झाले होते. त्यानंतर त्याना एम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वेस्ट आफ्रिका या देशाचा दौरा करून तो नागपूरला परतला होता. रुग्णालयात दाखल केल्यानंतर अवघ्या तीन दिवसात त्यांचा ओमायक्रॉन अहवाल निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.