नागपूर : नागपूर शहरातील कुख्यात गॅंगस्टर आबू खानला अटक करण्यात नागपूर पोलिसांना यश आले आहे. रविवारी दुपारी नागपूर पोलिसांच्या झोन चारच्या पथकाने आबू खानला भंडारामधून ताब्यात घेत (Abu Khan arrested from Bhandara) नागपुरात आणले. आबू खान नागपूरचा कुख्यात गुंड असून, अनेक वर्षांपासून तो नागपूर शहरात अमली पदार्थांच्या तस्करीमध्ये सहभागी (Involved in Many Smuggling) आहे. सुमारे सहा महिन्यांपूर्वी नागपूर पोलिसांनी त्याच्याविरोधात मोक्काअंतर्गत गुन्हा दाखल केला होता. मात्र, पोलीस त्याला बेड्या ठोकतील त्याच्या आधीच आबू खान फरार झाला होता.
आबू खान विरोधात पोलिसांत अनेक गुन्हे : आबू खान विरोधात नागपूर शहरातच 50 पेक्षा जास्त गुन्हे दाखल असून, गेल्या अनेक महिन्यांपासून तो नागपूर पोलिसांना चकवा देत कधी उत्तर प्रदेश, कधी छत्तीसगड, तर कधी गुजरातमध्ये लपून राहत होता. आबू खान भंडारामध्ये लपून बसल्याची माहिती नागपूर पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी सापळा रचून पकडले : त्या माहितीच्या आधारे पोलीस विभाग झोन चारच्या पोलीस उपायुक्त नरुल हसन यांच्या पथकाने पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या मार्गदर्शनात सापळा लावून ताब्यात घेतले. त्यानंतर त्याला नागपुरात आणण्यात आले आहे. अमली पदार्थ विक्रीत कुख्यात समजला जाणारा अबू खानला ताब्यात घेतल्याने गुन्हेगार क्षेत्रातील अनेकांचे धाबे दणाणले आहेत. ही मोठी करवाई ठरणार असून, या कडीसोबत जुडलेले अनेक मासे येत्या काळात नागपूर पोलिसांच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा : 57 गुन्हात जप्त 411 किलोचे अमली पदार्थ पोलिसांनी केले नष्ट