ETV Bharat / city

चार महिन्यांपासून संपकरी एसटी चालकांची डोळे तपासणी झाली नाही - विभाग नियंत्रक - एसटी चालकांची डोळे तपासणी

संपूर्ण महाराष्ट्रभर एसटी कर्मचाऱ्यांचे राज्यसरकारमध्ये विलीनीकरणासह अनेक मागण्यासाठी आंदोलन सुरू ( ST Workers Strike ) आहे. यामुळे बहुतांश कर्मचारी हे संपावर आहेत. त्यामुळे संपावरील कर्मचाऱ्यांची डोळे तपासणी मोहीम होऊ शकली नसल्याची माहिती नागपूरचे विभाग नियंत्रक निलेश बेलसरे यांनी दिली. मात्र, जे कर्मचारी संपातून पुन्हा चालक रुजू होत आहेत, त्यांना डोळे तपासणीनंतरच रुजू केले जात आहे, असेही बोलसरे यांनी सांगितले.

एसटी
एसटी
author img

By

Published : Mar 30, 2022, 3:20 PM IST

Updated : Mar 30, 2022, 8:29 PM IST

नागपूर - संपूर्ण महाराष्ट्रभर एसटी कर्मचाऱ्यांचे राज्यसरकारमध्ये विलीनीकरणासह अनेक मागण्यासाठी आंदोलन सुरू ( ST Workers Strike ) आहे. यामुळे बहुतांश कर्मचारी हे संपावर आहेत. त्यामुळे संपावरील कर्मचाऱ्यांची डोळे तपासणी मोहीम होऊ शकली नसल्याची माहिती नागपूरचे विभाग नियंत्रक निलेश बेलसरे यांनी दिली. मात्र, जे चालक संपातून पुन्हा कामावर रुजू होत आहेत, त्यांना डोळे तपासणीनंतरच रुजू केले जात आहे, असेही बोलसरे यांनी सांगितले.

नागपूर विभागात 622 चालक - नागपूर शहर आणि ग्रामीण भागात चार डेपो असून यामध्ये जवळपास 622 चालक आहे. यामध्ये 40 वर्षे वयोमर्यादेपेक्षा 196 चालक आहे. तेच चाळीशी ओलांडले 424 चालक आहे. चालकावर भरोसा ठेवून शेकडो प्रवासी दिवसभर प्रवास करतात. त्यामुळे डोळ्याच्या कमजोरीकडे लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठीच चाळीशीनंतर वेळोवेळी डोळे तपासणी करणे गरजेचे आाहे. जेणेकरून गरजेनुसार चष्मा तसेच इतर उपचार करून घेतले जाऊ शकेल.

नेत्र तज्ज्ञ म्हणतात शारिरिक बदलाचा भाग आहे - कुठल्याही व्यक्तींना वयाच्या चाळीशीनंतर डोळ्याची काळजी घेणे गरजेचे असते. यामागचे कारण चाळीशीनंतर डोळ्यातील सिलेरिया मसल कमजोर होतात. यालाच वैद्यकीय भाषेत 'प्रिसोबायोपीया' असे म्हणतात. यात वयानुसार डोळ्यांची पाहण्याची क्षमता कमी होते. पूर्वी हा त्रास साधारण चाळीशीनंतर होता होता. पण, सध्याच्या जीवनशैलीत झालेला बदल, मोबाइलच्या सतत वापरामुळे वयाच्या 35 वर्षानंतर काही व्यक्तीमध्ये हे लक्षण दिसत असल्याचे अभ्यासातून पुढे आल्याचे नेत्र विशेषज्ज्ञ रोहित मोटवणी यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले. तसेच वाहन चालक खासकरुन जे रात्री वाहन चालवतात त्यांना समोरून येणाऱ्या वाहनाच्या तीव्र लाईटमुळेही डोळ्यांचा त्रास होत असल्याचेही डोळ्यांवर याचा परिणाम होतो.

परिवहन विभागाकडून घेतली जाते काळजी - परिवहन विभागाकडून त्या विभागासाठी एका नेत्र तज्ज्ञाची नियुक्ती केली जाते. दर महिन्याला सुमारे 10 ते 20 जण आपल्या डोळ्याची तपासणी करून घेतात. डोळ्यासंदर्भात काही अडचणी असल्यास त्यावर उपचार केले जातात. परिणामतः त्यांच्या उपचारानंतर त्यांना शक्य असलेली कामे सोपवली जातात. वाहन चालवण्यास अयोग्य असल्यास त्यांना इतरत्र काही कामे दिली जातात, असेही बोलसरे यांनी सांगितले.

परवाना कसा मिळतो - पण जड वाहन चालकांना परवान्यासाठी डोळे तपासणीचे प्रमाणपत्र सादर करावे लागते. पण, सध्या घरबसल्यास ऑनलाइन शिकाऊ परवाना मिळत असल्याने मोठी समस्या निर्माण होत आहे. यातच नागपुरात काही डोळ्यांनी कमजोर असणारे व्यक्ती शिकाऊ परवाना मिळवतात.

हेही वाचा - नागपूरमध्ये मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात 10 वर्षीय मुलगी गंभीर जखमी

Last Updated : Mar 30, 2022, 8:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.