नागपूर : अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या येत्या फेब्रुवारी महिन्यात ( Union Minister Nitin Gadkari Unveiled Logo ) वर्धा येथे होणाऱ्या ९६ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ( 96th All India Marathi Literature Conference ) लोगोचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. यावेळी विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष मनोहर म्हैसाळकर ( Vidarbha Sahitya Sangh Manohar Mhaisalkar ), विलास मानेकर ( Vilas Manekar ), डॉ. रवींद्र शोभणे, तसेच वर्धा शाखेचे संजय इंगळे तिगावकर व डॉ. राजेंद्र मुंढे यांची यावेळी उपस्थित होते.
संमेलनात गांधी-विनोबांच्या विचारांनी प्रेरित असावे : वर्धा शहराचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान मोठे असून, महात्मा गांधी यांनी आयुष्याची बारा वर्षे वर्धाजवळील सेवाग्राम आश्रमात व्यतित केली होती. ही ऐतिहासिक पार्श्वभूमी लक्षात घेऊन प्रसिद्ध चित्रकार प्रमोद कळमकर यांनी वर्धा जिल्ह्याचा नकाशा, चरखा आणि लेखणीचा यांचा कलात्मक वापर करून हा लोगो तयार केलेला आहे. हे संमेलनात गांधी-विनोबांच्या विचारांनी प्रेरित असावे. त्यात तरुणाईचा सहभाग अधिकाधिक असावा आणि ते कायम स्मरणात राहील असे व्हावे, असे मत मनोहर म्हैसाळकर यांनी यावेळी व्यक्त केले.
सर्वतोपरी मदत करणार : नितीन गडकरी यांनी लोगोच्या कलात्मकतेचे कौतुक करतानाचा संमेलनाचे आयोजन भव्य होण्याकरिता सर्वतोपरी सहकार्य करण्याचे यावेळी आश्वासन दिले. विदर्भ साहित्य संघाच्या शतकोत्सवाच्या पार्श्वभूमीवर हे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन साहित्य वर्धा येथे आयोजित केले जात आहे. वर्धा येथील स्वावलंबी विद्यालयाच्या विस्तीर्ण मैदानात होत आहे.