ETV Bharat / city

झालेल्या विकास कामांची आठवण ठेवा बाकी समझनेवालों को इशारा काफी है - नितीन गडकरी - देवेंद्र फडणवीस

एकीकडे राज्यात महानगरपालिकांच्या आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची भाषा अन्य राजकीय पक्ष करत असताना दुसरीकडे भाजपने मात्र लोकांपर्यंत पोहोचून निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. याचीच प्रचिती नागपूरच्या सोनेगाव तलावाचे सौंदर्यीकरणाच्या भूमिपूजन सोहळ्याच्या कार्यक्रमातून आली आहे.

Nitin Gadkari Appeal to Voter
Nitin Gadkari Appeal to Voter
author img

By

Published : Aug 29, 2021, 8:14 PM IST

Updated : Aug 29, 2021, 8:34 PM IST

नागपूर - एकीकडे राज्यात महानगरपालिकांच्या आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याची भाषा अन्य राजकीय पक्ष करत असताना दुसरीकडे भाजपने मात्र लोकांपर्यंत पोहोचून निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. याचीच प्रचिती नागपूरच्या सोनेगाव तलावाचे सौंदर्यीकरणाच्या भूमिपूजन सोहळ्याच्या कार्यक्रमातून आली आहे. यावेळी जनतेच्या आशीर्वादामुळे अनेक कामे झाली आहेत. 'शहरात झालेल्या कामाची आठवण ठेवा, बाकी समझनेवालों को इशारा काफी है', असे म्हणत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मतदारांना साद घातली. याच कार्यक्रमात माजी मुख्यमंत्री फडणवीस यांनी गडकरी यांना आधुनिक नागपूरचे शिल्पकार म्हणून संबोधले.

निवडणुकीच्या अनुषंगाने पाऊले उचलली -

यात नागपूर शहराच्या सोनेगाव तलावाचे सौंदर्यीकरण काम मागील अनेक वर्षांपासून रखडले होते. या कामाला राज्याचे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांनी मदत केल्याने या कामाला गती मिळाली. यामुळे सर्वांच्या वतीने त्यांचे अभिनंदन आणि आभार मानत गडकरी यांनी फडणवीसांचे कौतुक केले. अनेक महत्वाचे प्रकल्प महानगर पालिकेत सत्ता असल्याने सुरू करू शकलो असेही त्यांनी सांगितले. पण यापूर्वी सोनेगाव तलावात कधी पाणी नसायचे. पण खोलीकरणानंतर पाणी असल्याचा आनंद आहे. यामुळे आतापासून लगतच्या विहिरीची पाणी पातळी स्त्रोत वाढणार असल्याचे गडकरी म्हणाले. पण या तलावाचे रक्षण आणि जतन करण्याची जवाबदारी स्थानिक नागरिकांची आहे, असेही त्यानी सांगितले.

भूमिपूजन कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी व देवेंद्र फडणवीस
हा फक्त ट्रेलर होता पिच्चर अभी बाकी है -

यासोबत आगामी निवडणुका पाहता वारंवार इकडे येणे होत नाही. पण झालेल्या कामाची आठवण नागरिकांना करून दिली. या पाच वर्षात जनतेचा आशीर्वाद लाभल्याने महत्वाचे काम करू शकलो. पण हा फक्त 'ट्रेलर' होता, पिच्चर अभी बाकी है" असे ते म्हणाले. ही काही निवडणुकीची सभा नाही, पण झालेल्या कामाची आठवण ठेवा, समझनेवालों को इशारा काफी होता है. अशा शब्दात त्यांनी मतदारांना साद घातली आहे.

गडकरी आधुनिक नागपूरचे शिल्पकार - फडणवीस

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वाखाली शहराचे आधुनिकीकरण होत आहे. खऱ्या अर्थाने आधुनिक नागपूरचे शिल्पकार हे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आहेत. अशा शब्दात माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गडकरींचे कौतुक केले. शहराचे केवळ सिमेंट रस्तेच नाही तर नाग नदीचे सौंदर्यीकरण, शुद्धीकरणाचे महत्वाचे प्रकल्प असो की, चांगले रस्ते, मैदान, रेल्वे स्टेशन, बस स्टेशन, इन्फ्रास्ट्रक्चर, मेट्रो, आंतरराष्ट्रीय शैक्षणिक संस्था असे अनेक महत्वाची कामे झाली आहेत. यामधून अनेकांना रोजगार उपलब्ध झाले आहेत. नागपूर शहराचा चेहरा मोहरा बदलण्याचे काम या निमित्ताने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या नेतृत्वात झाल्याचे ते म्हणाले.

2030 मध्ये जगातील 10 शहरांमध्ये नागपूर असेल -

नागपूर शहर शैक्षणिक हब होत चालले आहे. मेट्रोचा काय फायदा असा प्रश्न लोक करत आहेत. पण हे सर्व प्रोजेक्ट्सचे काम जे सुरू आहे ते जेव्हा पूर्ण होईल, तेव्हा मोठा बदल झाला. आंतराष्ट्रीय शहर म्हणून उदयास येईल. तसेच 2030 मध्ये जगातल्या 10 शहरांमध्ये नागपूर असेल, असा अहवाल एका संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात आहे, असेही ते म्हणाले.

यावेळी व्यासपीठावर माजी मुख्यमंत्री व विद्यमान विरोधा पक्षनेते देवेंद्र फडणवीस, महापौर दयाशंकर तिवारी, स्थायी समिती अध्यक्ष प्रकाश भोयर, सत्ता पक्षनेता अविनाश ठाकरे, नगरसेवक यासह अन्य मान्यवर उपास्थित होते.

Last Updated : Aug 29, 2021, 8:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.