ETV Bharat / city

Omicron Mutations : ओमायक्रॉनचे तीन नवे म्युटेशन वाढवणार चिंता? 'निरी'त संशोधन सुरू

author img

By

Published : Jan 24, 2022, 4:32 PM IST

Updated : Jan 24, 2022, 7:27 PM IST

दिवसेंदिवस ओमायक्रॉन व्हेरियंटच्या रुग्ण संख्येत वाढ होत असताना आता ओमायक्रॉनचे तीन म्युटेशन (Omicron Three Mutations) आढळून आले आहेत. नागपूर येथील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्था (निरी) मध्ये (NEERI) सुरू असलेल्या जीनोम सिक्वेन्सिंग चाचण्यांमध्ये (Genome sequencing) हा धक्कादायक खुलासा झाला आहे.

neeri
निरी नागपूर

नागपूर - कोरोनाच्या डेल्टा व्हेरियंटचा नागपुरात (Corona Delta Variant) मोठ्या प्रमाणात प्रसार झाला होता. आता ओमायकॉनसुद्धा (Omicron in Nagpur) टेंशन वाढवण्याच्या तयारीत असल्याचे दिसत आहे. दिवसेंदिवस ओमायक्रॉन व्हेरियंटच्या रुग्ण संख्येत वाढ होत असताना आता ओमायक्रॉनचे तीन म्युटेशन (Omicron Three Mutations) आढळून आले आहेत. नागपूर येथील राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्था (निरी) मध्ये (NEERI) सुरू असलेल्या जीनोम सिक्वेन्सिंग चाचण्यांमध्ये (Genome sequencing) हा धक्कादायक खुलासा झाला आहे. ओमायक्रॉनचे म्युटेशन किती घातक आहेत, या संदर्भात निरीतील शास्त्रज्ञ अभ्यास करत आहेत. यामध्ये बी.१.१.५२९, बीए १ आणि बीए २ अशी या व्हेरियंटची नावे आहेत.

  • ओमायक्रॉनचे तीन म्युटेशन -

उपराजधानी नागपुरात दिवसेंदिवस कोरोना आणि ओमायक्रॉनबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. महिन्याच्या सुरुवातीला शंभरच्या आत असलेली रुग्ण संख्या आता पाच हजारांच्या जवळ जाऊन पोहचली आहे. कोरोनाच्या डेल्टा व्हायरसचे सर्वाधिक रुग्ण आढळून येत असताना, आता नागपुरात ओमायक्रॉनबाधित रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे धोका आणखी वाढल्याचे अधोरेखित झाले आहे. ओमायक्रॉनचे म्युटेशन बी.१.१.५२९, बीए १ आणि बीए २ घातक आहेत किंवा नाही या संदर्भात प्राथमिक स्तरावर फारशी माहिती उपलब्ध नसली तरी येत्या काही दिवसांमध्ये यावर अभ्यास केला जाईल, त्यानंतरच या म्युटेशनच्या संदर्भात स्पष्टता येणार आहे.

  • निरीत सुरू आहे जीनोम सिक्वेन्सिंग -

राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी अनुसंधान संस्था (निरी) मध्ये गेल्या 15 दिवसांपासून जीनोम सिक्वेन्सिंग चाचणी सुरू करण्यात आली आहे. "सलाईन गार्गलींग" पद्धतीने जीनोम सिक्वेन्सिंग केले जात असून, या चाचणीत तपासण्यात आलेले बहुतांश नमुने हे ओमायक्रॉन बाधित आढळून येत आहेत. धक्कादायक म्हणजे ओमायक्रॉनचे तीन म्युटेशनसुद्धा याच दरम्यान आढळून आले आहेत.

  • मेडिकलचे 76 निवासी डॉक्टर पॉझिटिव्ह -

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत रुग्ण सेवेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावणाऱ्या डॉक्टरांना तिसऱ्या लाटेत सर्वाधिक संसर्ग होत असल्याचे पुढे आले आहे. नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) येथील 76 निवासी डॉक्टरांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे. यापैकी 52 डॉक्टर गृह विलगीकरणमध्ये असून, उर्वरित 22 डॉक्टर पूर्णपणे बरे होऊन कामावर परत आले आहेत, तर दोन डॉक्टर अजूनही ऍडमिट असल्याची माहिती आहे.

नागपूर ओमायक्रॉन व्हेरीयंट... चिंता नको.. हे व्हेरीयंट फारसे धोकादायक नाही - डॉ.अविनाश भोंडवे

जगभरात धुमागूळ घातलेल्या ओमायक्रॉन व्हायरसमध्ये नागपूर येथे 3 म्युटेशन आढळले आहेत.त्यावर भीतीचे किंवा चिंतेचे वातावरण नसून कोरोनाच्या बाबतीत अश्या पद्धतीने नवनवीन व्हेरियंट येतील आणि नागपूरमध्ये जे व्हेरियंट आढळून आले आहेत.ते फारसे धोकादायक नाही, अशी माहिती इंडियन मेडिकल असोसिएशनचे माजी अध्यक्ष डॉ.अविनाश भोंडवे यांनी दिली.

काही महिन्यांपूर्वी आटोक्यात आलेला कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव पुन्हा एकदा वाढू लागला आहे. दक्षिण आफ्रिकेत नव्यानं आढळून आलेला ओमायक्रॉन व्हेरिएंटनं जगभरा धुमाकूळ घातला आहे. ओमायक्रॉनमध्ये BA.1, BA.2 आणि BA.3 असलेले तीन उप-वंश किंवा जाती (स्ट्रेन) आहेत. त्यातच नागपूर येथे ओमायक्रॉनचे 3 म्युटेशन आढळले आहेत. निरी या संशोधन संस्थेच्या अहवालात ही बाब उघड झाली आहे. यानंतर नागपुरात चिंतेचं वातावरण पसरलं आहे.

गुजरातमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण वाढले

दरम्यान, गुजरातमध्ये ओमायक्रॉनचे नवीन ४१ रुग्ण आढळून आले आहेत. सध्या BA.1, BA.2 आणि BA.3 चे रुग्ण गुजरातमध्ये सापडले आहेत. यातील BA.2 व्हेरायंट युकेत मोठ्या प्रमाणावर पसरला असल्याचे वृत्त आहे. या व्हेरायंटचे रुग्ण गुजरातमध्येही जास्त असल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. परंतु, या व्हेरायंटची लक्षणे अगदी सौम्य आहेत. त्यामुळे घाबरून जाण्याची गरज नाही, असे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

Last Updated : Jan 24, 2022, 7:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.