ETV Bharat / city

Sharad Pawar :अल्पसंख्यांक समाजाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष करता येणार नाही - शरद पवार - Problems Faced By Indian Muslims

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( NCP President Sharad Pawar ) विदर्भ मुस्लिम इंटलेक्चुअल्स फोरमतर्फे ( Vidarbha Muslim Intellectuals Forum ) आयोजित चर्चासत्रात सहभागी झाले. भारतीय मुस्लिमां समोरील समस्या ( Problems faced by Indian Muslims ) याविषयावर या बैठकीत चर्चा झाली.

Sharad Pawar
शरद पवार
author img

By

Published : Oct 8, 2022, 5:56 PM IST

नागपूर - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार ( NCP President Sharad Pawar ) विदर्भ मुस्लिम इंटलेक्चुअल्स फोरमतर्फे ( Vidarbha Muslim Intellectuals Forum ) आयोजित चर्चासत्रात सहभागी झाले. भारतीय मुस्लिमां समोरील समस्या ( Problems faced by Indian Muslims ) याविषयावर या बैठकीत चर्चा झाली. तुम्ही जे मुद्दे उचलले आहे ते महत्वाचे आहे, त्यावर सखोल चर्चा आवश्यक आहे. मात्र, त्या मुद्द्यांकडे दुर्लक्ष नाही करता येत. मी पुन्हा येईल, तेव्हा तुमच्यासोबत बसून चर्चा करण्याची माझी तयारी असल्याचे शरद पवार म्हणाले आहेत.

शरद पवार

राजकीय प्रतिनिधित्व नाही - शरद पवार म्हणाले की हे सत्य आहे सध्या अल्पसंख्यांक समाजाला हवं तसे राजकीय प्रतिनिधित्व मिळत नाही. मात्र,आमच्या आठ खासदारांमध्ये दोन मुस्लिम असून त्यापैकी एक महिला आहे. आरक्षणची मागणी केली गेली. ते कसे करता येईल,यावर बसून विचार करण्याची गरज आहे.

अल्पसंख्यांक समाजाला नोकरीत वाटा कमी - मी उर्दू भाषेच्या विरोधात नाही, उर्दू चांगली भाषा आहे. उर्दू शाळेसह त्या राज्याची जी प्रमुख भाषा आहे, ती पण आवश्यक आहे. बेरोजगारीची समस्या अल्पसंख्यांक समाजात तसेच इतर समाजातील सर्व घटकांमध्ये आहे. मात्र, हे खरे आहे की अल्पसंख्यांक समाजाला नोकऱ्यांमध्ये मिळायला हवं तो वाटा मिळत नाहीये. सरकारी नोकऱ्या मिळवणाऱ्यांची यादी पाहिली तर मुस्लिमांची संख्या त्यांच्या लोकसंख्येच्या तुलनेत कमी आहे.

कलेच्या क्षेत्रात मुस्लिमांचे योगदान - कलेच्या क्षेत्रात अल्पसंख्याकांच्या योगदान लक्षणीय आहे. त्यामागे उर्दू भाषेचा योगदान महत्वाचा आहे. आज आपण बॉलीवूड मध्ये पाहतो, तर बॉलीवूड मध्ये मुस्लिमांचा योगदान नाकारता येणार नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.