नागपूर - काल विधानसभेची निवडणुकीत भाजप आमदार जगताप आणि आमदार मुक्ता टिळक यांच्या मतदानावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आक्षेप घेतला आहे. दोघांचेही मतदान नियमांना डावलून झाल्याचा नाना पटोले यांनी आरोप केला होता. याप्रकरणी निवडणूक आयोगाकडे तक्रार करण्यात आली होती. त्यावर निवडणूक आयोगाने तक्रार फेटाळली आहे. मात्र, आता या प्रकरणी आपण कोर्टात जाणार अशी प्रतिक्रिया पटोले यांनी दिली.
हेही वाचा - Vidhan Parishad election result : विधान परिषद निवडणुकीत कोणाला किती मते मिळाली? जाणून घ्या..
निवडणुकीत भाजपच्या दोन्ही आमदारांचे मतदान नियमांना डावलून झाले आहे. त्यांच्या मतदानाबाबत आक्षेप होता. तो निवडणूक आयोगासमोर मांडण्यात आला. मात्र तो त्यांनी फेटाळला. आता याप्रकरणी कोर्टात जाऊ, असे नाना पटोले म्हणाले. मुक्ता टिळक आणि जगताप हे दोघेही गंभीर आजाराने ग्रस्त आहेत. तरी देखील राज्यसभेच्या निवडणुकी प्रमाणे ते विधान परिषद निवडणुकीत मतदानासाठी विधान भवनावर आले होते. मात्र त्यांच्या मतदानावर काँग्रेसकडून आक्षेप गेण्यात आला. यामुळे मतमोजनीला उशीर झाला होता.
काँग्रेसचा आक्षेप आणि मतमोजणीला उशीर - काँग्रेसने भारतीय जनता पार्टीच्या दोन आमदारांच्या मतदानावर आक्षेप घेत मुख्य निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. त्यामुळे, मतमोजणी सुरू होऊ शकली नव्हती. भारतीय जनता पक्षाचे आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक हे दोघे आजारी असल्याने त्यांनी इतरांच्या सहकार्याने आपले मतदान पार पाडले. मात्र, काँग्रेस हा मतदान प्रक्रियेतील गोपनियतेचा भंग असल्याची तक्रार केली. मुख्य निवडणूक आयोगाने या तक्रारीची दखल घेत त्यावर शहानिशा केली. त्यात वेळ गेल्याने मतमोजणीस उशीर झाला. निवडणूक आयोगाच्या पडताळणीमध्ये काँग्रेसचा आक्षेप फेटाळण्यात आला आणि भारतीय जनता पार्टीच्या दोन्ही आमदारांची मते वैध ठरविण्यात आली.
भाजपचे नेते तथा खासदार आणि अनिल बोंडे यांनी कॉंग्रेस हरत आहे म्हणून पळ काढला असे ट्विट केले होते. यावर कोणाला वयक्तिक काम असतात. पण, भाजपच्या नेत्यांना असे काही बोलण्याची सवय झाली आहे. अग्निपथच्या बाबतीत तेच होत आहे. देशसेवेसाठी निघालेल्या लोकांना भाजपचे नेते भाजपच्या कार्यालयासमोर चौकीदार म्हणून लावू, असे बोलत आहे. अशा पद्धतीचे जे वक्तव्य केले जातात त्याचे उत्तर जनता योग्य वेळ आल्यावर देईल, असे प्रत्युत्तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी बोलताना दिले.
हेही वाचा - MLC Result 2022 : काँग्रेसच्या चंद्रकांत हांडोरे यांचा पराभव, भाई जगताप म्हणाले...