नागपूर - देशात सध्या कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत मृत्युतांडव सुरू आहे. याला केंद्राचे चुकीचे धोरण जवाबदार असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी नागपुरात माध्यमांशी बोलताना केली. लसीकरण करण्याचे उशिरा सुचलेले शहाणप आहे. त्यात इतर देशांना लशी देऊन भारताकडे दुर्लक्ष केल्याचाही आरोप यावेळी करण्यात आला.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले, की राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनींनी लसीकरणा अभावी सुरू होण्यास असमर्थ असल्याचे व्यक्त केले. पण असे असले तरी केंद्राने किमान 10 लाख लसी रोज द्याव्यात अशी मागणी केंद्राला केली आहे. रोज किमान 10 लाख लोकांना लसीकरण महाराष्ट्र सरकार करू शकेल, असेही काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी म्हटले आहे.
हेही वाचा-आरोग्याच्या पायाभूत सुविधांचे अहवाल गुरुवारपर्यंत द्या; राज्यांना 'सर्वोच्च' आदेश
ग्रामीण भागात स्मशानघाटाप्रमाणे स्थिती-
या परिस्थितीत लसीकरण करून घेणे हेच महत्वाचे पाऊल होते. पण केंद्राने पाऊल न उचलल्यामुळे शहर असो की ग्रामीण भाग सर्वत्र मृत्यूचा तांडव सुरू आहे. दोन्ही ठिकाणची परिस्थिती स्मशान घाटाप्रमाणे झाली आहे. या परिस्थितीला केंद्राचे चुकीचे धोरण जवाबदार असल्याचीही टीका नाना पटोले यांनी केली.
हेही वाचा-माजी पोलीस आयुक्त ज्युलिओ रिबेरो यांच्या लेखाला देवेंद्र फडणवीसांनी दिले उत्तर
चुकीच्या धोरणामुळे देशातील तरुणांचा मृत्यू...
अनेक लहान देशांनी पाहिले स्वतःचा देशात लसीकरण करून घेत देश कोरोनामुक्त केला. इस्त्राईल व ब्रिटन हे त्याचे उदाहरण आहे. भारतात हे करता आले असते. अधिक लशी निर्माण करण्यासाठी कंपन्याना बोलावून हे करता आले असते. पण केंद्र सरकारने पाकिस्तान व बांग्लादेशला लस पाठविली. यामागे काय उद्देश होता, हे वेळ सांगेल. पण यामुळे देशातील अनेक तरुणांचा जीव गेला. हा चुकीच्या धोरणांचा परिणाम आहे.
हेही वाचा-कोरोनावरील लसीचे उत्पादन आपल्याकडे, तरीही लस महाग कशी - प्रकाश आंबेडकर
मोफत लस देण्याचे म्हणणे उशिरा सुचलेले शहानपण!
18 ते 45 वयोगटातील लोकांना मोफत लस द्या, अशी विनंती केंद्राला केली आहे. हेच जर जानेवारी ते मार्च दरम्यान पाऊल उचलले असते. तर मृतांचे तांडव सध्या देशात सुरू झाले नसते. यामुळे हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे.
काँग्रेसने अगोदरपासून सतर्क केले, पण...
कोरोना देशात आल्यापासून राहुल गांधी व सोनिया गांधी हे ठोस पावले उचलण्याची मागणी करत आहे. पण त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले. त्यांना ट्रोल करून अपमान करण्याचे काम करण्यात आले. आज देशात उद्भवलेल्या कोरोनाचा परिस्थितीसाठी भारताला ट्रोल केले जात आहे. यात भारताची बदनामी होत आहे, याला केंद्र सरकार जबाबदार असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी व्यक्त केला आहे.