ETV Bharat / city

नागपुरात ६८ नवे कोरोना पॉझिटिव्ह.. एकूण रुग्णसंख्येने केला तीन हजारांचा आकडा पार - नागपूरात दिवसभरात ६८ जणांना कोरोनाबाधा

नागपूरात कोरोनाच्या रुग्णसंख्येने तीन हजारांचा टप्पा पार केला आहे. दिवसभरात नागपूर शहरात ६८ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली. त्यामुळे नागपुरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३०२७ इतकी झाली आहे.

Nagpur, the number of corona patients
नागपुरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या
author img

By

Published : Jul 20, 2020, 9:15 PM IST

नागपूर - उपराजधानी नागपूरात कोरोनाच्या रुग्णसंख्येने तीन हजारांचा टप्पा पार केला आहे. दिवसभरात नागपूर शहरात ६८ नवीन कोरोनाबाधित रुग्ण पुढे आले आहेत. त्यामुळे नागपुरातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ३०२७ इतकी झाली आहे.

पॉझिटिव्ह आलेले सर्व रुग्ण संशयित असल्याने त्यांना प्रसासनाने आधीच इन्स्टिट्यूटशनल क्वारंटाईन केले होते. त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली, ज्यात त्यांचा कोरोना अवहाल पॉझिटिव्ह आल्यानंतर सर्वाना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर आज ६८ कोरोना रुग्ण उपचारानंतर अगदी ठणठणीत बरे होऊन घरी देखील परतले आहेत. त्यामुळे नागपुरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १९३९ इतकी झाली आहे.

याशिवाय आज पुन्हा दोन रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. आतापर्यंत नागपूरात एकूण ५५ कोरोनाबाधित मृत्यू झाला आहे. महत्वाचं म्हणजे ५३ पैकी ३८ मृत्यू हे नागपुर जिल्ह्यातील आहेत. तर १७ मृत्यू हे नागपूर जिल्ह्या बाहेरील रुग्णांचे आहेत. यामध्ये अमरावती आणि अकोला येथील कोरोनामुळे नागपुरात मृत्यू झालेल्या रुग्णांचा समावेश आहे. सध्या नागपुरातील ०७ ठिकाणी १०३३ कोरोना रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय रुग्णालयात(मेयो) २२३ तर शासकीय वैद्यकीय रुग्णांलयात (मेडीकल) २३३, एम्स मध्ये ५३, कामठी येथील मिलीटरी हॉस्पिटलमध्ये २२ आणि खासगी रुग्णालयात २३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तर मध्यवर्ती कारागृहात तयार करण्यात आलेल्या कोविड केअर सेंटरमध्ये १२४ आणि आमदार निवास मध्ये ३०१ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. नागपूरात रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ६४ टक्के इतके आहे, तर मृत्यू दर हा १.८८ इतका आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.