ETV Bharat / city

Action On Viral Video : नागपुरात धावत्या कारवर स्टंटबाजी पडली महागात; पोलिसांनी केल्या कार जप्त - धावत्या कारवर स्टंटबाजी

सध्या सोशल मीडियावर फेमस होण्यासाठी विविध प्रकारचे व्हिडिओ बनवण्याची क्रेज ( Viral Video Nagpur ) सुरु आहे. यातून काही तरुण विविध स्टंटबाजी करत आहेत. यातच आता नागपुरात रात्री धावत्या कारवर बसून व्हिडिओ ( stunting on a speeding car ) तयार केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या तरुणांवर पोलिसांनी कारवाई केली ( Nagpur Police take action against youths ) आहे.

Viral Video Nagpur
धावत्या कारवर स्टंटबाजी
author img

By

Published : Apr 7, 2022, 2:31 PM IST

Updated : Apr 7, 2022, 3:35 PM IST

नागपूर - वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडीओ तयार करणे आणि ते व्हिडीओ नंतर सोशल मीडियावर व्हायरल ( Viral Video Nagpur ) करण्याची क्रेज संपूर्ण देशात आली आहे. मात्र उपराजधानी नागपुरातील तरुणांना काहीतरी वेगळे करून दाखवण्याचा प्रयत्न अंगाशी आला आहे. धावत्या कारवर बसून व्हिडीओ ( stunting on a speeding car ) तयार करणाऱ्या सात तरुणांवर पोलिसांनी कारवाई केली ( Nagpur Police take action against youths ) आहे. या तरुणांचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी अवघ्या काही तासात सर्वांना ताब्यात घेतले होते, पोलिसांनी या तरुणांना समज देऊन सोडले असले तरी त्यांच्या कार जप्त केल्या आहेत.

पोलीस उपायुक्त सारंग आव्हाड यांची प्रतिक्रिया

'आळा घालण्यासाठी नागपूर पोलीस यंत्रणा सक्षम' - कारवर बसून स्टंट करण्याचा व्हिडिओ हा एक एप्रिल रोजीच्या रात्रीचा असल्याचे पोलीस उपायुक्त सारंग आव्हाड यांनी स्पष्ट केले आहे. रात्रीच्या अंधारात पोलिसांची नजर चुकवून अश्या प्रकारे काही तरुण स्टंटबाजी करत असतात, त्यांना आळा घालण्यासाठी नागपूर पोलीस यंत्रणा सक्षम असल्याचं देखील ते म्हणाले आहेत.

व्हायरल व्हिडीओ प्रकरण - नागपूर शहराच्या सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील छावणी परिसरात काही तरुण महागड्या गाड्यांच्या बोनेटवर आणि छतावर बसून स्टंटबाजी करत असल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता हा व्हिडिओ नागपूरचा असल्याचं स्पष्ट झाल्यानंतर शहर वाहतूक विभाग पोलीसांनी कारवाईला सुरुवात केली आहे. व्हिडिओमध्ये दिसत असलेल्या सर्व कारचा नंबर दिसत असल्याने पोलिसांनी तात्काळ कारच्या मूळ मालकांना शोधून काढले आहे.

दुरुस्तीसाठी आलेल्या कारवर स्टंटबाजी - ज्या कारवर तरुणांनी स्टंटबाजी केली, त्या कार दुरुस्तीकरिता कामठी मार्गावरील एका गॅरेजमध्ये आल्या होत्या, अशी माहिती पुढे आली आहे. पोलिसांनी याप्रकरणी मूळ कार मालकांवर देखील गुन्हा नोंदविला आहे, त्यांचा देखील सहभाग या प्रकरणात पोलिसांना आढळून आला आहे.

हेही वाचा - Accident In Washim City : वाशिम शहरालगत खाजगी बस-टँकरचा अपघात, 3 जण ठार; 8 जखमी

Last Updated : Apr 7, 2022, 3:35 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.