नागपूर- अश्लील व्हिडिओ पाहून शारिरीक संबंध ठेवताना तरुणाचा मृत्यू झालेल्या 'लव्ह, सेक्स अँड डेथ' प्रकरणात पोलिसांनी धक्कादायक खुलासे केले आहेत. तरुणाबरोबर लॉजमध्ये गेलेली २० वर्षीय तरुणी ही त्याची पत्नी आहे. दोघांना मुलगादेखील आहे.
लॉजमध्ये मृत्यू झालेल्या तरुणाबरोबर त्याने २० वर्षीय तरुणीसोबत कायद्याने लग्न केले असल्याचा खुलासा झाला आहे. गेल्या पाच वर्षांपासून त्यांच्यात प्रेमसंबंध होते. मात्र, एखाद्या विकृतीप्रमाणे हे संपूर्ण प्रकरण असल्याचे दिसून येत आहे. या घटनेचे वर्णन करताना पोलिसांनादेखील शब्द मिळत नव्हते. दोघांनी शारीरिक संबंधासाठी पोझिशनसाठी व्हॉट्सअपवर माहिती आदान-प्रदान केल्याचे पोलिसांनी सांगितले.
हेही वाचा-पॉर्न फिल्म बघून शारीरिक संबंध ठेवताना गळफास लागून तरुणाचा मृत्यू
काय आहे प्रकरण
मोबाईलवर अश्लील व्हिडिओ बघून वेगवेगळ्या प्रकारच्या पोझिशनमध्ये शाररिक संबंध प्रस्थापित करण्याच्या नादात तरुणाला गळफास लागून त्याचा मृत्यू झाला आहे. ही घटना नागपूर जिल्ह्याच्या सावनेर तालुक्यातील खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या लॉजवर घडली आहे. मृत हा इंजिनिअर असून तो सध्या बेरोजगार आहे. मृत तरुण आणि त्याचे २० वर्षीय तरुणीमध्ये गेल्या काही वर्षांपासून प्रेमसंबंध आहे. दोघांनीही बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखला. दोघेही खापरखेडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दहेगाव (रंगारी) परिसरात असलेल्या महाराजा लॉजवरील खोली बुक केली होती. यावेळी वेगवेगळ्या पोझिशनमध्ये शारीरिक संबंध ठेवताना दोघांनी दोरीचा उपयोग केला. तरुण खुर्चीवर बसल्यानंतर त्याचे हात आणि पाय दोरीने बांधण्यात आले आले. त्याचवेळी ती दोरी त्याच्या गळ्याच्याभवतीसुद्धा आवळण्यात आली होती. तरुणी बाथरूममध्ये गेली असता तरुण खुर्चीसह खाली कोसळला. त्यामुळे त्याच्या गळ्याभोवती असलेला दोर आवळला गेला. त्याला गळफास लागून त्याचा मृत्यू झाला आहे. ज्यावेळी ती तरुणी बाथरूमच्या बाहेर आली. तोपर्यंत तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर लगेचच या घटनेची माहिती लॉज व्यवस्थापकांना देण्यात आली होती. त्यांनी पोलिसांना या संदर्भात माहिती दिल्यानंतर पोलीसदेखील घटनास्थळी दाखल झाले होते. पोलिसांनी तरुणाचा मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठविला. या घटनेचा तपास सुरू करण्यात आला आहे.
हेही वाचा-महाज्योतीमधून लवकरच ओबीसीच्या 200 विद्यार्थ्यांना फेलोशिप देणार - विजय वडेट्टीवार
पहिल्यांदाच गेले होते लॉजवर
पहिल्यांदाच दोघांनी लॉजवर जाण्याचा बेत आखला होता. म्हणूनच त्यांनी लॉजवर जातानासोबत दोरी आणि चाकूसुद्धा आणला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. एवढेच नाही तर दोघांनी लॉजवर हातपाय बांधल्यानंतर नग्न अवस्थेत फोटोदेखील काढून घेतले होते. त्यावेळी दोरीचे एक टोक लोखंडी ग्रीलला बांधले होते. पोलिसांनी दोघांचेही मोबाईल जप्त करून फॉरेन्सिक तपासणीकरिता पाठविल्याची माहिती खापरखेडाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक पी. एन. भटकर यांनी दिली.
खुनाची घटना वाटत नाही
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून तपास सुरू केला. प्राथमिक तपासावरून तरी ही घटना खुनाची दिसत नसल्याची माहिती पोलीस निरीक्षक पी. एन. भटकर यांनी दिली आहे. घटनास्थळी आढळलेले सर्व साहित्य फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतरच पुढील कार्यवाही केली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.