ETV Bharat / city

भाजप पदाधिकाऱ्यांच्या विरोधात सिल्लेवाडा महिला सरपंचांची पोलिसांत तक्रार

नागपूर काँग्रेस नंतर आता भाजप पदाधिकाऱ्यांच्या विरोधात सिल्लेवाडा गावच्या महिला सरपंच प्रमिला बागडे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.

author img

By

Published : Sep 14, 2019, 9:58 PM IST

सिल्लेवाडा सरपंच प्रमिला बागडे

नागपूर - सिल्लेवाडा येथे १२ सप्टेंबरला गुरुवारी प्रवासी वाहतूक बसचे उद्घाटन करण्यात आले. या उदघाटन समारंभ प्रसंगी गावच्या सरपंचांना न बोलवता भाजप पदाधिकाऱ्यांनी सिटी बसचे लोकार्पण केले, आणि आपल्या विरोधात आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा आरोप सरपंच प्रमिला बागडे यांनी केला आहे.

भाजप पदाधिकाऱ्यांच्या विरोधात सिल्लेवाडा महिला सरपंच प्रमिला बागडे यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली

हेही वाचा.......या कारणामुळे सिल्लेवाड्यातील अनेक घरांवर लागले भाजपचे झेंडे

भाजप जिल्हाध्यक्षांनी सावनेर विधानसभेचे काँग्रेस आमदार सुनील केदार यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार केली होती. ती तक्रार खोटी असून सुनील केदार यांनी भाजपचे झेंडे दिसेल तर त्यांना घरात घुसून मारू असे वक्तव्य महिला सरपंचाच्या संरक्षणात केले, अशी माहिती जिल्हा काँग्रेस कमिटी आणि सिल्लेवाडा सरपंच यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली आहे. त्यांनी खापरखेडा पोलिसांत भाजप पदाधिकाऱ्यांविरोधात तक्रार दाखल केल्याची माहितीही यावेळी दिली आहे.

हेही वाचा... काँग्रेस आमदाराविरोधात नागपूर भाजप जिल्हाध्यक्षाची पोलीस तक्रार

काय आहे प्रकरण ?

सिल्लेवाडा गावात गुरुवारी प्रवासी वाहतूक बस सेवेच्या उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. तेथे कार्यक्रमाचे श्रेय घेण्यावरून आमदार सुनील केदार व भाजप कार्यकर्त्यांमध्ये शाब्दिक वाद झाला होता. यावेळी भाजपचे झेंडे कुणाच्या घरावर दिसल्यास त्याला मारण्याची धमकी आमदार सुनील केदार यांनी दिली होती.

या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर देखील व्हायरल झाला होता. तेव्हा केदार यांनी भाजप कार्यकर्त्यांना उघड धमकी दिल्याचा आरोप करीत त्यांच्याविरुद्ध भाजप जिल्हाध्यक्ष डॉ. राजीव पोतदार यांच्या नेतृत्वात पोलिसात तक्रार दाखल केली होती.

Intro:नागपूर

काँग्रेस नंतर आता भाजप पदाधिकाऱ्यां विरोधत महिला सरपंचांनी केली पोलिसांत तक्रार

भाजप जिल्हाध्यक्षांनि सावनेर विधानसभेचे काँग्रेस आमदार सुनील केदार यांच्या विरोधात पोलिसांत तक्रार केली ती खोटी असून सुनील केदार यांनी भाजपचे झेंडे दिसेल तर त्यांना घरात घुसून मारू असं वक्त्यव्य महिला सरपंचाच्या संरक्षणात केलं अशी माहिती जिल्हा काँग्रेस कमिटी आणि सील्लेवाडा च्या सरपंचांनी पत्र परिषदेत दिली Body:१२ सप्टेंबर ला सिटी बस च्या उदघाटन समारंभा प्रसंगी सरपंचाना न बोलवता भाजप पदाधिकाऱ्यांनी सिल्लेवाडा येथे सिटी बस चे लोकार्पण केले. आणि महिला सरपंचान सोबत आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा आरोप महिला सारपंच प्रमिला बागडे नि केलाय. भाजप पदाधिकाऱ्यांन विरोधात खापरखेडा पोलिसांत तक्रार केल्याची महिती देखील त्यांनी या वेळी दिली

बाईट- प्रमिला बागडे, सरपंच, सील्लेवाडा
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.