ETV Bharat / city

Shelter home for beggar : भिक्षेकरीमुक्त नागपूरसाठी महापालिकेने सुरू केले भिक्षेकरी निवारागृह सुरू - Beggar free Nagpur

केंद्र सरकार पुरस्कृत सर्वसमावेशक भिक्षेकरी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत नागपूर शहरात पहिला भिक्षेकरी निवारागृह ( Shelter home for beggar in Nagpur ) साकारण्यात आला आहे. भिक्षेकरीमुक्त नागपूरच्या ( Beggar free Nagpur ) दृष्टीने महत्वाचे पाऊल असल्याचे मत नागपूर महानगर पालिकेचे प्रशासक राधाकृष्णन बी यांनी सांगितले आहे.

छायाचित्र
छायाचित्र
author img

By

Published : Apr 28, 2022, 3:42 PM IST

नागपूर - महानगर पालिकेच्या पुढाकाराने केंद्र सरकार पुरस्कृत सर्वसमावेशक भिक्षेकरी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत नागपूर शहरात पहिला भिक्षेकरी निवारागृह ( Shelter home for beggar ) साकारण्यात आला आहे. भिक्षेकरीमुक्त नागपूर ( Beggar free Nagpur ) शहराच्या दृष्टीने महत्वाचे पाऊल असल्याचे मत नागपूर महानगर पालिकेचे प्रशासक राधाकृष्णन बी यांनी सांगितले आहे.

माहिती देताना देवेंद्र क्षीरसागर

केंद्र सरकारच्या सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयामार्फत देशातील मुख्य शहरे भिक्षेकरीमुक्त शहर करण्यासाठी राष्ट्रीय स्तरावर मोहिम राबविण्यात येत आहे. या मोहिमेंतर्गत प्रायोगिक तत्त्वावर देशातील 10 महानगरपालिका निवडण्यात आल्या आहेत. त्यात नागपूर शहराचा समावेश आहे.

शहरातील भिक्षेकऱ्यांचे सर्व्हेक्षण - नागपूर महानगरपालिके तर्फे शहरातील भिक्षेकऱ्यांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे. सर्व्हेक्षणात १ हजार ६०१ भिक्षेकरी व्यक्ती रेल्वे स्टेशन, बस स्थानक, मिठा निम दर्गा, राजाबक्शा मंदिर, शनि मंदिर, यशवंत स्टेडियम अशा विविध स्थळी आढळून आले आहे.

भिक्षेकऱ्यांना स्वयं सक्षमतेसाठी प्रशिक्षण - १५० भिक्षेकऱ्यांची निवारागृहात व्यवस्था करून त्यांना स्वयंसक्षमतेसाठी प्रशिक्षण देण्यासाठी शहरात ६ भिक्षेकरी पुनर्वसन केंद्र तयार करण्यात येणार आहेत. त्यातील पहिल्या टप्प्यात १ हजार ६०१ भिक्षेकऱ्यांपैकी १५० भिक्षेकऱ्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी महानगरपालिकेच्या समाज विकास विभागातर्फे घाट रोड येथील तुलस्यान हाऊस येथे भिक्षेकरी निवारागृह सुरू करण्यात आला आहे. निवारागृहात भिक्षेकरींना ६ महिने ठेवण्यात येणार आहे. या ६ महिन्यात त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आवश्यक रोजगाराचे प्रशिक्षण दिले जाईल. त्यांचे समुपदेशन, आरोग्यविषयक उपचार, अन्न, वस्त्र, औषधोपचार, रोजगाराच्या सुविधा, प्रशिक्षण आदी सर्व उपलब्ध करून देण्यात येणार आहे. नागपूर शहर भिक्षेकरीमुक्त शहर व्हावे, यासाठी हा प्रकल्प पथदर्शी ठरणार आहे.

हेही वाचा - NCP Agitation Nagpur : राष्ट्रवादी काँग्रेसने भोंगा आंदोलन करत पिटली महागाईची दवंडी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.