ETV Bharat / city

'टँकरमुक्त नागपूर'साठी महापालिकेचे पहिले पाऊल; 120 टँकर्स बंद करण्याचा निर्णय - nagpur tanker news

महानगर पालिकेने पाणी पुरवठा करणारे 120 टँकर्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शहराच्या सीमावर्ती भागातील हुडकेश्वर नरसाळा परिसर टँकरमुक्त होणार आहे.

nagpur water supply
महानगर पालिकेने पाणी पुरवठा करणारे 120 टँकर्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
author img

By

Published : Feb 28, 2020, 2:20 PM IST

नागपूर - महानगर पालिकेने पाणी पुरवठा करणारे 120 टँकर्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शहराच्या सीमावर्ती भागातील हुडकेश्वर नरसाळा परिसर टँकरमुक्त होणार आहे. या टँकर्सवर दरवर्षी 28 कोटी रुपये खर्च करण्यात येतात. मात्र प्रशासनाने टँकर्स बंद करण्याचा निर्णय घेतल्याने दरवर्षी जवळपास 10 ते 11 कोटींची बचत होणार आहे. याआधी शहरात 346 टँकर्सने पाणीपुरवठा करण्यात येत होता.

महानगर पालिकेने पाणी पुरवठा करणारे 120 टँकर्स बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

याचसोबत जलवाहिनी नसलेल्या भागांमध्ये पाणीपुरवठा करण्यासाठी टँकर्सची व्यवस्था करण्यात आली असल्याचे मनपाने स्पष्ट केले आहे. मार्च 2020 अखेरीस संपूर्ण हुडकेश्वर नरसाळा परिसर टँकरमुक्त करण्याचे मनपाचे लक्ष्य असून आणखी 100 टँकर्स कमी करण्याच्या दृष्टीने पाऊल उचलण्यात येत असल्याचे पालिकेच्या वतीने स्पष्ट करण्यात आले आहे.

मात्र, उन्हाळ्याची झळ वाढणार असल्याने पाईपलाईन नसणाऱ्या भागात पाण्याचा तुटवडा जाणवू शकतो. यामुळे येणाऱया काळात पालिकेला पाणी पुरवठ्यासाठी समांतर पर्याय शोधण्याची गरज भासणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.