ETV Bharat / city

Ward Formation Nagpur : नागपूर महापालिकेत 38 ऐवजी असणार 52 वॉर्ड, नगरसेवकांची संख्याही वाढणार

author img

By

Published : May 19, 2022, 1:40 PM IST

आगामी काळात होऊ घातलेल्या नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी आज अखेर नवीन वॉर्ड पुनर्रचनेसंबंधी अंतिम अधिसूचना जाहीर करण्यात आली. महाराष्ट्र राज्य महानगरपालिका अधिनियमांच्या कलम ५ च्या तरतुदीनुसार महानगरपालिकेत निवडून जाणाऱ्या सभासदांची (नगरसेवकांची) संख्या १५६ इतकी निश्चित करण्यात आली आहे.

Nagpur mnc General Election
नागपूर पालिका प्रभाग रचना

नागपूर - आगामी काळात होऊ घातलेल्या नागपूर महानगरपालिका निवडणुकीसाठी आज अखेर नवीन वॉर्ड पुनर्रचनेसंबंधी अंतिम अधिसूचना जाहीर करण्यात आली. महाराष्ट्र राज्य महानगरपालिका अधिनियमांच्या कलम ५ च्या तरतुदीनुसार महानगरपालिकेत निवडून जाणाऱ्या सभासदांची (नगरसेवकांची) संख्या १५६ इतकी निश्चित करण्यात आली आहे. नागपूर महानगरपालिकेच्या अंतिम प्रभाग रचनेनुसार नागपूर महापालिकेत यापुढे 38 ऐवजी 52 वॉर्ड असणार आहेत. राज्य निवडणूक आयोगाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार कोणता प्रभाग कसा असेल याची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

माहिती देताना मनपा आयुक्त

हेही वाचा - राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षेच्या तारखा जाहीर

आज जाहीर झालेल्या अधिसूचनेत वॉर्डच्या नवीन सीमा जाहीर करण्यात आल्या आहेत. याआधी नागपूर महानगरपालिकेत 38 प्रभाग होते, मात्र ही संख्या 52 झाल्याने नव्या 14 वॉर्डची वाढ झाली आहे. त्यामुळे, आता नागपूर मनपात 151 नगरसेवकांची संख्या वाढून 156 होणार आहे. आज जाहीर झालेल्या अधिसूचनेत शहरातील प्रभाग क्रमांक आणि त्या प्रभागात असलेली एकूण लोकसंख्या जाहीर करण्यात आली आहे.

2011 च्या जनगणनेच्या आकडेवारीवर प्रभाग रचना -

अंतिम प्रभाग रचना ही सन 2011 च्या जनगणनेच्या आकडेवारीवर आधारित असून, त्या अनुषंगाने एकूण लोकसंख्या, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांची लोकसंख्या त्या आधारे निश्चित करण्यात आली आहे. सदर मंजूर प्रभाग रचनेनुसार नागपूर महानगरपालिकेत एकूण 156 सदस्य असणार असून, एकूण प्रभागाची संख्या 52 इतकी असणार आहे. प्रभागाची सरासरी लोकसंख्या 47 हजार 067 इतकी असून सर्वाधिक लोकसंख्या ही प्रभाग क्र. 29 ची 54 हजार 93 इतकी असून सर्वात कमी लोकसंख्या प्रभाग क्र. 48 ची 41 हजार 92 इतकी असणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाची मंजुरी - राज्य निवडणूक आयोगाने नागपूर मनपाच्या अंतिम प्रभाग रचनेला मंजुरी प्रदान केली आहे. निवडणूक आयोगाने प्रभाग क्रमांक २९, ४६ आणि ४८ मध्ये काही बदल केले आहेत. प्रभाग २९ मध्ये लोकसंख्येत २ हजार ३०० ने वाढ झालेली आहे. तसेच, प्रभाग ४६ मध्ये लोकसंख्या ९४ ने कमी झाली आहे. प्रभाग ४८ मधील लोकसंख्या १ हजार २६८ ने कमी झालेली आहे. बाकी प्रभाग रचनेमध्ये काही बदल नाही.

हेही वाचा - Hedgewar Smriti Bhavan : गेल्यावर्षी दोन दिवस नागपुरात मुक्कामी होता दहशतवादी रईस अहमद असादउल्ला शेख

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.