नागपूर - नवीन वर्षाच्या पहिल्याच महिन्यात नागपूरकरांना महामेट्रोकडून (Nagpur Maha Metro) अमूल्य अशी भेट मिळणार आहे. महामेट्रोकडून पारडी-कळमना मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू (Metro Passenger service on Rich 4 lane) करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. सीताबर्डी इंटरचेंज ते प्रजापती नगर या 9 किलोमीटरच्या मार्गावर एकूण नऊ स्टेशन तयार करण्यात आले आहेत. बहुतांश स्टेशन्स आणि ट्रॅकचे काम पूर्ण झाल्यानंतर या मार्गावर मेट्रोची ट्रायल सुरू झाली आहे. येत्या महिन्याभरात सर्व तांत्रिक बाबी तपासून झाल्यानंतर महामेट्रोला (Nagpur Maha Metro project) या मार्गावर प्रवासी वाहतूक सुरू करण्याची रीतसर परवानगी मिळेल, अशी आशा व्यक्त केली जाते आहे.
सेंट्रल एव्हेन्यूवर ट्रायल रन यशस्वी -
नागपूरमध्ये महामेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील काम येत्या काही महिन्यात पूर्ण होणार आहे. सर्वात कठीण असलेल्या सेंट्रल एव्हेन्यू मार्गावरील मेट्रोचे निर्माण कार्य आता 99 टक्के पूर्ण झाले आहे. त्यामुळेच या मार्गावर ट्रायल रन घेण्यात आली. प्रथमदर्शनी सेंट्रल एव्हेन्यूवर ट्रायल रन यशस्वी झाली आहे, त्यामुळे तांत्रिक बाबी तपासण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असल्याने लवकर मेट्रो रेल्वेचे संरक्षण आयुक्त येत्या काही दिवसात रिच-4 च्या मार्गाचे निरीक्षण करणार आहेत.
हे ही वाचा -Nagar Panchayat Election 2021 : राज्यातील 105 नगरपंचायती, भंडारा व गोंदिया जिल्हा परिषद,15 पंचायत समित्यांचे आज मतदान
८६८० कोटींचा प्रकल्प पूर्णत्वाकडे- ब्रिजेश दीक्षित
नागपूर महामेट्रोच्या पहिल्या टप्यात शहरातील चार भागात मेट्रो धावणार आहेत, सध्या ऑरेंज लाईनवर कस्तुरचंद् पार्क ते सीताबर्डी आणि खापरी मेट्रो सेवा सुरू आहे. बतर एक्वा लाईनवर सीताबर्डी ते लोकमान्य नगर हिंगणापर्यत मेट्रो धावत आहे. येत्या काही दिवसांमध्ये ऑटोमोटिव्ह चौक ते खापरी आणि प्रजापती नगर ते लोकमान्य नगर दरम्यान मेट्रो धावायला सुरुवात होणार आहे. मेट्रोच्या पहिल्या टप्प्यातील प्रकल्प ८,६८० कोटींचा असून तो आता पूर्णत्वाकडे जात असल्याचे समाधान महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित यांनी व्यक्त केलं आहे.
सीताबर्डी इंटरचेंज ते प्रजापती नगर मार्गावरील स्टेशन -
सीताबर्डी इंटरचेंज ते प्रजापती नगर हा मार्ग नऊ किलोमीटर लांबीचा आहे आणि या मार्गावर एकूण 9 स्टेशन तयार करण्यात आले आहेत. यामध्ये सीताबर्डी इंटरचेंज, कॉटन मार्केट, नागपूर रेल्वे स्टेशन, दोसर भवन चौक, अग्रसेन चौक, चितार ओळी, चौक टेलिफोन एक्सचेंज, डॉक्टर आंबेडकर चौक, वैष्णो देवी चौक आणि प्रजापती नगर रेल्वे स्टेशनचा समावेश करणार आला आहे.