ETV Bharat / city

लहान मुलांची साक्ष नाकारता येणार नाही- नागपूर खंडपीठ - नागपूर खंडपीठ

पोलीस तपासात लक्ष्मीचा मृत्यूच्या वेळी 11 वर्षाचा मुलगा घरात होता. त्याच्या जबाबात त्याने आईला वडिलांनी रॉकेल टाकून पेटवून दिले असल्याचे म्हटले.  याच आधारावर घटनेच्या चौथ्या दिवशी आरोपी अंकुश चव्हाण विरोधात पत्नीच्या खुनाचा गुन्हा दाखल केला होता.

नागपूर खंडपीठ
नागपूर खंडपीठ
author img

By

Published : Sep 25, 2021, 9:27 PM IST

नागपूर - लहान मुलांच्या साक्षीच्या उलट तपासणीत त्याला कोणी शिकवले तर नाही ना याची खात्री करावी. पण लहान मुलांची साक्ष एकदम नाकारता येत नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे.

यवतमाळ जिल्ह्याच्या पुसद तालुक्यातील पिंपळगाव येथील आईच्या खुनात वडीलाविरुद्ध 11 महिन्याच्या मुलाच्या साक्षीने शिक्षा सुनावण्यात आली होती. या प्रकरणात मुलाच्या साक्षीवरून सुनावलेली शिक्षा योग्य आहे, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने स्पष्ट केले आहे.

हेही वाचा-गुजरातमध्ये राजकीय भूकंप... कन्हैया कुमारांसह जिग्नेश मेवानी काँग्रेसमध्ये करणार पक्षप्रवेश

काय आहे खुनाचे प्रकरण-

लक्ष्मी अंकुश चव्हाण असे खून झालेल्या महिलेचे नाव होते. या प्रकरणात लक्ष्मीचा विवाह 15 वर्षांपूर्वी अंकुश धर्मा चव्हाण याच्याशी झाला होता. यात 12 नोव्हेंबर 2014 मध्ये लक्ष्मीचा मृत्यू झाला. तिने आत्महत्या केल्याचे नातेवाईक यांनी सांगितले होते. पण पोलीस तपासात लक्ष्मीचा मृत्यूच्या वेळी 11 वर्षाचा मुलगा घरात होता. त्याच्या जबाबात त्याने आईला वडिलांनी रॉकेल टाकून पेटवून दिले असल्याचे म्हटले. याच आधारावर घटनेच्या चौथ्या दिवशी आरोपी अंकुश चव्हाण विरोधात पत्नीच्या खुनाचा गुन्हा दाखल केला होता.

हेही वाचा-कमला हॅरिस यांच्या 'या' वक्तव्यावरून राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर साधला निशाणा

आरोपीने मुलाच्या साक्षीला दिले होते आव्हान-

सत्र न्यायालयात मुलाची साक्ष नोंदवण्यात आली आहे. त्यामध्ये अंकुश चव्हाण याला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली. लहान मुलाची साक्ष ग्राह धरू नये, असा आरोपीच्यावतीने न्यायालयात बचाव करण्यात आला होता. मुलाला वडिलांविरोधात साक्ष देण्यासाठी शिकविले जाण्याची शक्यता आहे. यामुळे जन्मठेप रद्द करण्याची मागणी आरोपीच्यावतीने उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात करण्यात आली होती.

हेही वाचा-महाराष्ट्र पोलिसांमध्ये प्रशिक्षणाचा अभाव - एनसीपीसीआर अध्यक्ष प्रियांक कानूनगो

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.