ETV Bharat / city

Nagpur Electric Poll Collapsed : भला मोठा विजेचा खांब कोसळला, कारचालक थोडक्यात बचावला

नागरपुरातील दीक्षाभूमी परिसरात एक विजेचा खांब कोसळला ( Nagpur Electric Poll Collapsed ) आहे. यामध्ये कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र, शेजारून जाणारा कारचालक थोडक्यात बचावला आहे.

Nagpur Electric Poll Collapsed
Nagpur Electric Poll Collapsed
author img

By

Published : Feb 9, 2022, 1:06 PM IST

नागपूर : रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा ठरणारा विजेचा खांब अचानक कोसळल्याची घटना नागपूर शहरातील काचीपुरा चौकात ( Nagpur Electric Poll Collapsed ) घडली. यामध्ये तिथून जाणारी एक कार थोडक्यात बचावली असून, तिची फक्त काच फुटली आहे. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

सविस्तर माहिती अशी की, दीक्षाभूमी जवळील काचीपुरा चौकात विजेचे खांब हटविण्याचे काम सुरू ( Nagpur Dikshabhumi Area ) आहे. कोणत्याही उपाययोजना न करता खांब काढण्याचे काम सुरु होते. तेव्हाच तेथून एक कार रामदासपेठ चौकाकडून दीक्षाभूमीच्या दिशेने जात होती. पण, चालकाने प्रसंगावधान राखत वाहन बाजुने घेतल्याने मोठा अनर्थ टळला आहे. घटनेदरम्यान चालकाशिवाय कारमध्ये कोणीही नव्हते. त्यामध्ये कारची फक्त काच फुटली आहे.

कोसळलेला विजेचा खांब

सुरक्षेकडे दुर्लक्ष

रस्त्यावरील खांब काढत असताना वीज वितरण कंपनी कडून कोणतीही दक्षता घेण्यात आली नव्हती. ज्या मार्गावर काम सुरू आहे, तिथे बॅरिकेड्स लावून आधी मार्ग बंद करायला हवा होता. मात्र, तसे न करता वाहतूक सुरू असताना विजेचे खांब काढण्याचे काम सुरू होते. त्याचदरम्यान भला मोठा विजेचा खांब खाली कोसळला सुदैवाने या घटनेत कुणालाही दुखापत झाली नसली तरी एका कारचं आर्थिक नुकसान झाले आहे.

हेही वाचा - Nana Patole Criticism PM : पंतप्रधानाच्या 'त्या' वक्तव्याविरोधात राज्यात काँग्रेसचे आंदोलन ; नाना पटोलेंची टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.