नागपूर : नागपूर गुन्हे शाखेने अमली पदार्थांविरोधात जोरदार मोहीम राबवून एकाच रात्रीतून 66 आरोपींना जेरबंद केले आहे. पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या नेतृत्वात अमली पदार्थ विरोधी पथकाने ६६ आरोपींना जेरबंद केले आहे. यात 51 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या आरोपींमध्ये अमली पदार्थ विकणाऱ्या 5 आरोपींचा समावेश आहे
66 जण ताब्यात
एकीकडे मुंबई आणि बॉलिवूड मध्ये ड्रग्स प्रकरण गाजत असताना उपराजधानी नागपूर शहरात गुन्हे शाखेने अमली पदार्थांविरोधात जोरदार मोहीम राबविली. नागपूर शहर अमली पदार्थ मुक्त असावे या दृष्टीने शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी एक अभियान हाती घेतले आहे. त्यानुसार मंगळवारी रात्री गुन्हे शाखेचे डीसीपी चिन्मय पंडित यांच्या नेतृत्वाखाली एकाच वेळी तब्बल 51 ठिकाणी अमली पदार्थ विक्रेत्यांसह सेवन करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात आली. यात पोलिसांनी 66 जणांना ताब्यात घेतले असून 51 गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.
1 लाख 11 हजारांचा मुद्देमाल जप्त:-
गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने केलेल्या कारवाईत मुख्यतः गांजा जप्त करण्यात आला आहे. ज्याची किंमत 1 लाख 11 हजार रुपये इतकी आहे. यापुढे सुद्धा अश्या प्रकारची कारवाई सुरू राहणार असल्याची माहिती पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांनी दिली आहे.
अमली पदार्थ विक्रेत्यांवर नागपूर गुन्हे शाखेची कारवाई; 66 आरोपी ताब्यात - nagpur crime branch conducted raid on 51 places against drugs
नागपूर गुन्हे शाखेने अमली पदार्थांविरोधात जोरदार मोहीम राबवून एकाच रात्रीतून 66 आरोपींना जेरबंद केले आहे. पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित यांच्या नेतृत्वात अमली पदार्थ विरोधी पथकाने ६६ आरोपींना जेरबंद केले आहे.