ETV Bharat / city

Nagpur Crime : नागपूरमध्ये धाडसी चोरी; एटीएम फोडून 5 लाख 80 हजारांची चोरी

Nagpur Crime : एसबीआय बँकेचे एटीएम अगदी मुख्य मार्गावर आहे. त्यामुळे या भागात सदैव वर्दळ असते. शिवाय एटीएम सेंटरच्या बाजूला अनेक मोठे रुग्णालय असल्याने रात्री उशिरा पर्यंत चहल- पहल राहते. रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेत चोरट्यांनी एटीएम सेंटरमध्ये प्रवेश करून अगदी आरामात मशीनमध्ये ठेवलेले 5 लाख 80 हजार रुपये लंपास केले आहे

Nagpur Crime
Nagpur Crime
author img

By

Published : Jul 30, 2022, 5:12 PM IST

नागपूर - नागपूर शहरातील सीताबर्डी पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या रामदासपेठ भागातील एसबीआय बँकेच्या एटीएममध्ये अतिशय शिताफीने धाडसी चोरी झालेली आहे. एटीएम मशीनचे नुकसान न करता चोरट्यांनी 5 लाख 80 हजारांची रोख रक्कम लंपास केली आहे. रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेत चोरट्यांनी आपला डाव साधला आहे. ही बाब दुपारपर्यंत कुणाच्याही लक्षात देखील आली नाही. दुपारी 2 वाजल्याच्या सुमारास एटीएम मधील रक्कम संपल्यामुळे एटीएममध्ये चोरी झाल्याची बाब समोर आली आहे. त्यानंतर लगेचचं सीताबर्डी पोलीस ठाण्याला घटनेची माहिती देण्यात आली असून पोलिसांनी फॉरेन्सिक एक्सपर्टच्या मदतीने तपास सुरू केला आहे.

Nagpur Crime

5 लाख 80 हजार रुपये लंपास - एसबीआय बँकेचे एटीएम अगदी मुख्य मार्गावर आहे. त्यामुळे या भागात सदैव वर्दळ असते. शिवाय एटीएम सेंटरच्या बाजूला अनेक मोठे रुग्णालय असल्याने रात्री उशिरा पर्यंत चहल- पहल राहते. रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेत चोरट्यांनी एटीएम सेंटरमध्ये प्रवेश करून अगदी आरामात मशीनमध्ये ठेवलेले 5 लाख 80 हजार रुपये लंपास केले आहे.

सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू - एटीएम मशीन मधून 5 लाख 80 हजार रुपये चोरून नेल्याची तक्रार दाखल झाली. सीताबर्डी पोलीस ठाण्याचे पथक आणि वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहे. पोलिसांनी एटीएम सेंटरमध्ये लावण्यात आलेल्या सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू केलं असून लवकरच आरोपींचा शोध लागेल अशी माहिती पोलीस निरीक्षक अतुल सबनीस यांनी दिली आहे.

घटनेच्या वेळी सुरक्षारक्षक नव्हते - रात्रीच्या अंधाराचा गैरफायदा घेऊन चोरट्यांनी एटीएम मधील रक्कम लंपास केली आहे. घटनेच्या वेळी एटीएम बाहेर सुरक्षा रक्षक नसल्याने चोरट्यांनी अगदी आरामात आपला डाव साधला आहे. मात्र, ज्या पद्धतीने चोरीची घटना घडलेली आहे. त्यावरून अनेक प्रश्न देखील उपस्थित केले जात आहेत.

हेही वाचा - Chandrapur Shocking video : 166 सेकंदाची मृत्युशीं झुंज, पहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.