ETV Bharat / city

..तर नागपुरात लॉकडाऊन सोबतच कडक संचारबंदी; आयुक्त तुकाराम मुंढेंची ताकीद - nagpur city news

जर शासनाच्या नियमांचे पालन होणार नसेल तर नागपुरात लॉकडाऊन सोबतच कडक संचारबंदी लागू करावी लागेल, असे संकेत नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहे.

nagpur corporation commissioner tukaram mundhe
आयुक्त तुकाराम मुंढे
author img

By

Published : Jul 24, 2020, 2:01 AM IST

नागपूर - कोरोना रूग्णांची संख्या नागपूरात दिवसेंदिवस वाढत आहे. याला बेजबाबदापणे वागणारे नागरिकच कारणीभूत आहेत. जर शासनाच्या नियमांचे पालन होणार नसेल तर नागपुरात लॉकडाऊन सोबतच कडक संचारबंदी लागू करावी लागेल, असे संकेत महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहे. शिवाय दोन तीन दिवस परिस्थितीचे निरीक्षण करून त्यांनुसार निर्णय घ्यावा लागेल अशी ताकीद तुकाराम मुंढे यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जनतेसोबत फेसबुकवरून संवाद साधताना हे संकेत देण्यात आले आहे.

नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे...

नागपूरातील गेल्या काही दिवसापासून लॉकडाऊन होणार असल्याच्या चर्चा सर्वत्र सुरू आहेत. त्यानुसारच विविध तर्क वितर्क लावले जात आहेत. अशातच नागपूरात लॉकडाऊन कि संचारबंदी? या विषयी महारानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जनतेशी फेसबुस संवाद साधला. बेजबाबदार नागरिकांमुळे आणि १०० टक्के नियमांचे पालन होत नसल्याने नागपुरात कोरोनाच्या रूग्णसंख्येत वाढ होत आहे. जर नागरिकांकडून हे थांबले नाही तर दोन तीन परिस्थितीचा दिवसात निरीक्षण करून पुढील निर्णय घ्यावे लागतील, असे संकेत आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहे.

हेही वाचा - शिवाजी महाराजांचा आदरच, मात्र.... घोषणा वादावर व्यंकय्या नायडू यांची प्रतिक्रिया

महानगरपालिकेचा मुख्य उद्देश हा कोरोना रूग्ण संख्येत घट करणे हाच आहे. मात्र, नागरिकांकडूनच नियमांचे उल्लंघन होत असल्याने परिस्थिती कशी नियंत्रणात येईल? असा सवालही मुंढे नी उपस्थित केला आहे. त्यामुळे बाजारपेठामध्ये सोशल डिस्टन्सिंग असो वा मास्क लावणे, या नियमांचे पालन नागरिक करत नसल्याचे तुकाराम मुंढे यांनी सांगितले. त्यामुळे कोरोना मार्गदर्शक तत्वांचे पालन करा, सोबतच आपल्या जीवनशैलीत बदल करा, जेणेकरून कोरोनाचा फैलाव थांबवता येईल. शिवाय गरज नसतांना घराबाहेर पडणे, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे, एका दुचाकीवर दोन तीन व्यक्ती बसणे, हे थांबणे अत्यंत गरजेचे असल्याचे मुंढेनी सांगितले.

शासनेने अनलॉक करून मुभा दिली परंतु नागरिकांनी नियमांचे पालन न करता रस्त्यावर उतरत आहे. त्यामुळेच नागपूरातील कोरोनाची स्थिती बिघडत असल्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले. त्याचबरोबर येणारा ऑगस्ट महिना हे सण उत्सवाचे आहे. त्यामुळे कोणताही सण सार्वजनिक साजरा होणारा नाही. प्रत्येकांनी व्यक्तीगत साजरे करा. शिवाय केला तर सर्व नियमांचे पालन करून करावे लागेल असे ही मुंढे यांनी सांगितले. त्यामुळे नागरिकांना वर्तवणूकीत बदल दिसले नाहीत किंबहूना नियमांचे पालन झाले नाहीत तर पुन्हा लॉकडाऊन करावा लागेल असेही आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले.

हेही वाचा - विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालून वैद्यकीय परीक्षा नको; अमित देशमुखांच्या कुलगुरुंना सूचना

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.