ETV Bharat / city

'कोरोना टेस्टिंगची संख्या वाढविण्यात आल्याने पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढली' - nagpur latest news

कोरोनाचे रुग्ण वाढल्याने संचारबंदी लावण्यात आली असली तरी नागरिकांनी घाबरण्याचे कारण नसल्याचे मनपा आयुक्तांनी म्हटले आहे. शहरात कोरोना टेस्टिंगची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आल्याने पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढल्याचे त्यांनी सांगितले आहे.

nagpur commisioner radhakrishnan b
nagpur commisioner radhakrishnan b
author img

By

Published : Mar 17, 2021, 5:47 PM IST

Updated : Mar 17, 2021, 5:53 PM IST

नागपूर - गेल्या पंधरा दिवसांपासून उपराजधानी नागपुरात कोरोनारुग्णांच्या संख्येत मोठी वाढ नोंदविण्यात आली आहे. त्यामुळे समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोनाची साखळी तोडण्याच्या उद्देशाने शहरात आठ दिवसांची संचारबंदीदेखील सुरू करण्यात आली आहे. त्या पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणाऱ्या दुकानांसाठी नवी नियमावलीही जाहीर केली आहे. कोरोनाचे रुग्ण वाढल्याने संचारबंदी लावण्यात आली असली तरी नागरिकांनी घाबरण्याचे कारण नसल्याचे मनपा आयुक्तांनी म्हटले आहे. शहरात कोरोना टेस्टिंगची संख्या मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आल्याने पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढल्याचे त्यांनी सांगितले आहे.

विकेंड कर्फ्यूला प्रतिसाद नाही

गेल्या महिन्यात शहरात झालेल्या लग्न समारंभासह अनेक सामाजिक कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येत लोकांची गर्दी जमा झाल्याचे पाहायला मिळाले, ज्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव झपाट्याने झाला आहे. पुढे हा धोका टाळण्यासाठीच शहरात सुरुवातीला विकेंड कर्फ्यू लावण्यात आला होता, मात्र त्याला फारसा प्रतिसाद शहरवासीयांनी दिला नसल्यानेच संचारबंदीचा निर्णय घ्यावा लागल्याचे ते म्हणाले.

चार झोनमध्ये सर्वाधिक रुग्ण

गेल्या महिनाभरापासून नागपूर शहरात आणि संपूर्ण जिल्ह्यातच कोरोनारुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे, मात्र शहराचा विचार केला तर महानगरपालिकेच्या चार झोनमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत. यामध्ये धरमपेठ, लक्ष्मीनगर, हनुमान नगर आणि मंगळवारी झोनचा समावेश आहे.

सुरू केले जाणार क्वारंटाइन सेंटर

आजच्या घडीला नागपुरात कोरोनाच्या अ‌ॅक्टिव रुग्णांची संख्या ही २० हजार इतकी झाली आहे. त्यापैकी बहुतांश रुग्ण हे होम आयसोलेशनमध्ये उपचार घेत आहेत, मात्र भविष्यात क्वारंटाइन सेंटरची गरज भासणार असल्याने गेल्या वर्षी ज्या ठिकाणी विलगीकरण सेंटर तयार करण्यात आले होते, त्या सर्व केंद्रांशी पत्रव्यवहार सुरू असल्याची माहिती महानगरपालिका आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी दिली आहे. यामध्ये आमदार निवास, वनामतीचा समावेश आहे.

Last Updated : Mar 17, 2021, 5:53 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.