नागपूर - एमपीएससी परीक्षा रद्द झाल्याने उपराजधानी नागपुरातही विद्यार्थी संतप्त झाले आहेत. अनेक वेळा परीक्षा रद्द झाल्याने विद्यार्थी आक्रमक झाले आहेत. विद्यार्थ्यांनी ठाकरे सरकर विरोधात रस्त्यावर उतरून जोरदार घोषणाबाजी केली. राज्यात आरोग्य विभागाची परीक्षा होऊ शकते, अर्थसंकल्पीय अधिवेशन होऊ शकते मग केवळ एमपीएससीची परीक्षा घेण्यालाच काय अडचणी आहे? असा प्रश्न विद्यार्थ्यांनी उपस्थित केले आहेत.
हेही वाचा - MPSCची परीक्षा पुढे ढकलल्याने काँग्रेस,राष्ट्रवादीची नाराजी
गेल्या महिनाभरापासून राज्यात कोरोनाची स्थिती पुन्हा बिघडलेली आहे,या पार्श्वभूमीवर परीक्षा घेतल्यास अडचणी वाढण्याची शक्यता असल्याने या महिन्यात होणारी नियोजित राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे. हा निर्णय जाहीर होताच विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. राज्याच्या इतर शहरांप्रमाणे नागपूरातील विद्यार्थ्यांनी संतप्त आंदोलन करत राज्य सरकारच्या निर्णया विरोधात निषेध नोंदवला आहे.
नागपूर हे विदर्भातील सर्वात मोठं आणि राज्यातील महत्वाचं शहर असल्याने या ठिकाणी अनेक जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी एमपीएससीसह स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करण्यासाठी वास्तव्यास आहेत. या आधीसुद्धा कोरोनामुळे अनेक वेळा परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागलं आहे. घरापासून दूर राहत असल्याने राहण्याचा, जेवणाचा खर्च भागवणेसुद्धा कठीण झाले आहे. अश्या परिस्थितीत राज्य सरकारने एमपीएससीची परीक्षा रद्द केल्याने विद्यार्थ्यांसमोर विद्यार्थ्यांन समोर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. शिवाय अनेक विद्यार्थ्यांचे वय निघून जाणार असल्याने त्यांची संधी हुकणार असल्याने विद्यार्थ्यांनी रोष व्यक्त केला आहे.
हेही वाचा - एमपीएससी परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाचा फेरविचार करा : नाना पटोले