ETV Bharat / city

Umesh Kolhe Murder Case: उमेश कोल्हे हत्या प्रकरणात खासदार अनिल बोंडेंचे पोलिसांवर गंभीर आरोप

महाविकास आघाडी सरकारच्या काळात अमरावती शहरात अवैध धंदे वाढले होते. अशा लोकांना राजकीय संरक्षण मिळाले त्यामुळे त्यांचे गट तयार झाले. म्हणून, अमरावती शहर भयग्रस्त झाले होते असेही अनिल बोंडे म्हणाले आहेत. उमेश कोल्हे हत्या ( Umesh Kolhe Murder ) प्रकरणात बोलताना त्यांनी याचा संदर्भ दिला.

MP ANIL BONDE
खासदार अनिल बोंडे
author img

By

Published : Jul 6, 2022, 5:19 PM IST

नागपूर - नुपूर शर्मा यांची सोशल मीडियावर वादग्रस्त पोस्ट ( Nupur Sharmas Controversial post ) शेअर केल्यामुळे अमरावतीत उमेश कोल्हे यांची निर्घृण हत्या ( Umesh Kolhe Murder ) झाली होती. याप्रकरणात इरफान नावाचा एक आरोपी तसेच रजाक नावाच्या एका धर्मगुरूचे राजकीय संबंध तपासले पाहिजे अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा खासदार अनिल बोंडे ( BJP Rajya Sabha MP Anil Bonde ) यांनी केली आहे. शिवाय या प्रकरणात अमरावती पोलिसांतील एका पोलीस कर्मचाऱ्याचा देखील सहभाग असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.

खासदार अनिल बोंडे

महाविकास आघाडीच्या काळात अवैध धंदे वाढले - या प्रकरणाचा तपास आता एनआयए करत आहे. महाविकास आघाडी सरकारच्या ( Mahavikas Aghadi government ) काळात अमरावती शहरात अवैध धंदे वाढले होते. अशा लोकांना राजकीय संरक्षण मिळाले त्यामुळे त्यांचे गट तयार झाले म्हणून अमरावती शहर भयग्रस्त झाले होते असेही अनिल बोंडे म्हणाले आहेत.

बोंडे यांचे पोलिसांवर गंभीर आरोप - 21 जून रोजी उमेश कोल्हे यांची हत्या झाली होती. पोलिसांकडे घटनेशी संबंधित सीसीटीव्ही फुटेज होते. तरीदेखील अमरावती पोलिसांनी हे प्रकरण दडपण्यासाठी अनेक प्रयत्न केल्याचा आरोप खासदार अनिल मुंडे ( MP Anil Munde ) यांनी केलेला आहे. उमेश कोल्हे यांची हत्या नुपूर शर्मा यांची वादग्रस्त पोस्ट शेअर केल्यामुळे झाली. ही माहिती देखील लपवून ठेवण्यात पोलिसांनी मोठी भूमिका बजावल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे राज्यसभा खासदार अनिल बोंडे यांनी केला आहे. प्रकरण दडपण्यासाठी पोलिसांनी कोल्हे कुटुंबियांवर दबाव आणला होता. असा देखील आरोप त्यांनी केला आहे. दुसरीकडे या प्रकरणाचा तपास एएनआयकडे गेल्यानंतर अवघ्या सहा तासात दोन आरोपींना अटक झाली, त्यामुळे एकूणच पोलिसांच्या भूमिकेवर संशय व्यक्त केला जातोय.

उमेश कोल्हे मृत्यू प्रकरण - उमेश कोल्हे 21 जून रोजी रात्री 10.30 वाजता त्यांचे 'मेडिकल' बंद करून घरी जात होते. तेव्हा त्यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. त्यावेळी उमेश कोल्हे यांचा मुलगा संकेत त्याची पत्नी वैष्णवीसोबत दुसऱ्या बाईकवर होता. मुलगा संकेतनं दिलेल्या माहितीनुसार 'मोटारसायकलीवरून दोन जणांनी उमेश कोल्हे यांची बाईक अडवली आणि गळ्यावर चाकूनं हल्ला केला. त्यावेळी त्यांच्या गळ्यातून बरंच रक्त वाहीले. त्यानंतर हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

हेही वाचा -Spiritual Leader Murder : नाशिक पोलिसांचा खुलासा! पैशांच्या वादातून मुस्लिम धर्मगुरू सुफी चिस्ती यांचा खून

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.