ETV Bharat / city

मोती नाला जलसंवर्धन प्रकल्पामुळे 'या' गावातील शेती झाली समृद्ध - मोती नालामुळे शेतकऱ्यांना फायदा होणार

मोती नाला सुमारे नऊ किलोमीटर लांबीचा आहे. मोती नाला आणि उपनाल्यांवर जलसंवर्धनाचे कार्य करण्यात आले आहे. त्यातून मोती नाल्याच्या पात्रांमध्ये सुमारे 280 सहस्त्र घनमीटर (280-TMC) एवढा भूपृष्ठीय जलसाठा तयार झाला आहे. या भूपृष्ठीय जलसाठ्यामुळे वार्षिक पुनर्भरण योगदान दर दरवर्षी सुमारे 620 सहस्त्र घन मीटर एवढे भूजल समृद्ध झाले आहे.

मोती नाला
मोती नाला
author img

By

Published : Oct 19, 2021, 5:10 PM IST

Updated : Oct 19, 2021, 5:25 PM IST

नागपूर - गेल्यावर्षी पिण्याच्या पाण्याची कमतरता भासल्यानंतर वर्धा जिल्ह्यात जलसंवर्धनाचे अनेक महत्वपूर्ण कामे पूर्ण झाली आहेत. त्यापैकीच एक म्हणजे तामसवाडा पॅटर्नवर आधारित मोती नाला जलसंवर्धन प्रकल्प आहे. वर्धा तालुक्यातील परसोडी, उमरी, टेंभरी, मांडवा, पुलई, बेलगाव या गावांमधून मोती नाला वाहतो. मात्र गेल्या काही वर्षांपासून हा नाला मृतप्राय झाला होता. त्यामुळे हजारो हेक्टर शेती संकटात आली होती. शिवाय पावसाळ्यात मोती नाल्याला पूर देखील येत असल्याने समाजसेवक सुनील गफाट आणि ग्रामस्थांनी मिळून या संदर्भात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे निवेदन सादर केले होते. गडकरींनी देखील या निवेदनाची तातडीने दखल घेऊन जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (JNPT) च्या सीएसआर अंतर्गत निधी उपलब्ध करून दिला. ज्यामुळे आज हा मोती नाला पूर्ण क्षमतेने भरलेला आहे. जल-भुवैज्ञानिक यांच्या मार्गदर्शनाखाली मोती नाल्याचे खोलीकरण केल्यानंतर तामसवाडा पॅटर्नवर आधारित मोती नाला येथे जलसंवर्धन करण्याच्या उद्देशाने एक बंधारा बांधण्यात आला आहे. ज्याचे निरीक्षण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केले आहे.

मोती नाला जलसंवर्धन प्रकल्पामुळे 'या' गावातील शेती झाली समृद्ध

मोती नाला सुमारे नऊ किलोमीटर लांबीचा आहे. मोती नाला आणि उपनाल्यांवर जलसंवर्धनाचे कार्य करण्यात आले आहे. त्यातून मोती नाल्याच्या पात्रांमध्ये सुमारे 280 सहस्त्र घनमीटर (280-TMC) एवढा भूपृष्ठीय जलसाठा तयार झाला आहे. या भूपृष्ठीय जलसाठ्यामुळे वार्षिक पुनर्भरण योगदान दर दरवर्षी सुमारे 620 सहस्त्र घन मीटर एवढे भूजल समृद्ध झाले आहे. या भूजल पुनर्भरण आतून जमिनीत पावसाच्या सहाशे सहस्त्र घनमीटर अर्थात सुमारे 60 कोटी लिटर पाणी भूजलात दरवर्षी प्राप्त होणार आहे. याचा शेतीला मोठा फायदा होईल.

वेगळ्या पद्धतीचा बंधारा

एखाद्या नदी किंवा नाल्याचे पाणी अडवण्यासाठी बंधारा बांधण्यात येतो. साधारणतः कोल्हापुरी बंधारा आपल्याकडे प्रचलित आहे. ज्यामध्ये सिमेंटच्या पिशव्यांमध्ये रेती(वाळू) भरून नदी पत्रात त्या पिशव्या टाकल्या जातात. मात्र मोती नाल्यावर वेगवेगळ्या पद्धतीचा बंधारा कम ब्रिज बांधण्यात आला आहे. ज्यामध्ये नाल्यावर पूल तयार करून वाहत्या दिशेने "व्ही" आकाराचे काँक्रीट बांधकाम करण्यात आले आहे. त्याला एक दरवाजा देखील देण्यात आला आहे. कायमस्वरूपी हा बंधारा असून पुढील अनेक या बंधाऱ्याच्या शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

अनेक गावातील शेतीला होणार फायदा

तामसवाडा पॅटर्नवर आधारित मोती नाला जलसंवर्धन प्रकल्प हा शेकडो गावांच्या शेतीला नवसंजीवनी देणारा ठरणार आहे. नाल्यात आता बाराही महिने पाणीसाठा उपलब्ध राहणार असल्याने शेतकरी वर्ग सुखावला आहे. भविष्यात या भागातील शेतकरी ऊस लागवडीकडे वळणार असल्याची प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी दिली आहे.

हेही वाचा - आर्यन खान प्रकरणात शिवसेना नेते किशोर तिवारी यांची उडी, सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल

Last Updated : Oct 19, 2021, 5:25 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.