नागपूर - शहर आणि जिल्ह्यात मिळून गुरुवारी 4306 कोरोनाबधितांची भर पडली आहे. आठव्या दिवशीही बाधितांच्या तुलनेत बरे होणाऱ्याची रुग्णसंख्या अधिक आहे. यात 6526 जण हे कोरोनातून बरे झाले आहेत. यात शुक्रवारी आलेल्या अहवालात 79 जण हे कोरोनामुळे दगावले तर, सक्रिय रुग्ण संख्या घटून आता 62 हजारवर आली आहे.
एकूण 4306 रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह
गुरुवारी नागपूर जिल्ह्यात 22 हजार 298 संशयितांची कोरोना चाचणी करण्यात आली. यामध्ये एकूण 4306 रुग्णांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये शहरी भागात 2255 तर ग्रामीण भागातील 2039 बाधित रुग्ण मिळून आले आहे. तसेच 79 रुग्णांचा नागपूर जिल्ह्यात कोरोनाने मृत्यू झाला आहे. यामध्ये शहरी भागात 43, ग्रामीण भागात 24 तर जिल्हाबाहेरील 12 जण हे कोरोनामुळे दगावले आहे. तेच शुक्रवारी 6 हजार 526 जण कोरोनामुक्त झाले आहे. सक्रिय रुग्णसंख्येत सातव्या दिवसात घट होऊन 76 हजार वरून 62298 पोहोचली आहे. यामुळे मागील सात दिवसांत 14 हजारच्या घरात रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
पूर्व विदर्भात 11 हजार 84 जण झाले कोरोनामुक्त
गुरुवारी आलेल्या अहवालात पूर्व विदर्भात 11 हजार 84 जण हे कोरोनामुक्त झाले आहेत. यात 8 हजार 199 जण नव्याने कोरोनाबाधित मिळून आले आहेत. पूर्व विदर्भातील सहा जिल्ह्यातील 145 जण हे कोरोनामुळे दगावले आहेत. यात मागील काही दिवसात काही जिल्ह्यात कोरोना बाधितांचा आलेख खाली येतांना दिसून येत आहे. यात बाधितांच्या तुलेनेत सरासरी 2 हजार पेक्षा जास्त रुग्ण हे कोरोनावर विजय मिळवत आहेत. यामुळे सक्रिय रुग्णाचा आकडा सुद्धा घसरत जात आहे.