ETV Bharat / city

सदभाऊंच्या बु... ला आग लागली आहे - आमदार अमोल मिटकरी - आमदार अमोल मिटकरी नागपूर

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे आडनाव बदलून आगलावे करा, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केल्यानंतर आज राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी सदाभाऊंना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सदाभाऊ यांच्या आमदारकीची टर्म संपलेली आहे. ते महाविकास आघाडीच्या कामांमुळे अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे, त्यांच्याच बु.. आग लागली असल्याचे वक्तव्य अमोल मिटकरी यांनी केले आहे.

MLA Amol Mitkari comment on sadabhau khot
आमदार अमोल मिटकरी नागपूर
author img

By

Published : Mar 29, 2022, 2:30 PM IST

नागपूर - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांचे आडनाव बदलून आगलावे करा, अशी टीका सदाभाऊ खोत यांनी केल्यानंतर आज राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी सदाभाऊंना जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. सदाभाऊ यांच्या आमदारकीची टर्म संपलेली आहे. ते महाविकास आघाडीच्या कामांमुळे अस्वस्थ झाले आहेत. त्यामुळे, त्यांच्याच बु... आग लागली असल्याचे वक्तव्य अमोल मिटकरी यांनी केले आहे. ते आज माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मतदारसंघात अनेक विकास कामांच्या उद्घाटन सोहळा निमित्ताने नागपुरात आले असताना बोलत होते.

प्रतिक्रिया देताना आमदार अमोल मिटकरी

हेही वाचा - Power Board Employees Strike Nagpur : नागपुरात खासगीकरण विरोधात वीज कर्मचाऱ्यांचे 'काम बंद' आंदोलन

शरद पवार यांच्या संदर्भात बोलताना सदभाऊंनी एक लक्षात ठेवावे की, आपण सूर्याबद्दल बोलतो आहे. सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करतील तर ती थुंक तुमच्याच चेहऱ्यावर उडणार आहे, याचे भान ठेवून बोलावे, असा टोमणा अमोल मिटकरी यांनी मारला आहे. मुळात सदाभाऊ जे बोलत आहेत हे त्यांचे वक्तव्य नसून मास्टर माईंड देवेंद्र फडणवीस यांचे असल्याचे ते म्हणाले. आग लावण्याचे काम भारतीय जनता पार्टी सातत्याने करत आहे. भाजपपासून महाराष्ट्राला धोका निर्माण झाला असल्याचे ते मिटकरी म्हणाले.

तानाजी सावंत म्हणजे पक्षप्रमुख नाहीत : महाविकास आघाडीत शिवसेना पक्षाची घुसमट होते आहे. कार्यकर्त्यांवर अन्याय होतो आहे. केवळ पक्षप्रमुखांच्या आदेशाची आम्ही वाट बघत आहे, असे वक्तव्य शिवसेना आमदार तानाजी सावंत यांनी केले आहे. यावर अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली. तानाजी सावंत यांनी मांडलेली भूमिका ही पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची नाही. महाविकास आघाडी मध्ये सर्वकाही आलबेल आहे. महाराष्ट्राला शाबूत ठेवायचे असले, तर भाजपला दूर ठेवावे लागेल, असे देखील मिटकरी म्हणाले.

अनिल देशमुखांचे मंत्रिमंडळात पुनरागमन होईल : भ्रष्टाचाराच्या आरोपात कारागृहात असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मतदारसंघातील विकास कामांचे उद्घाटन करण्याकरिता राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी नागपूरला आले होते. भाजपने कटकारस्थान करून अनिल देशमुख यांना अडकवले आहे. सचिन वाझे रोज रंग बदलत आहे. परमबीर सिंग सारखा भ्रष्टाचारी सुद्धा काही सिद्ध करू शकला नाही. त्यामुळे, लवकरच देशमुख निष्कलंक होऊन बाहेर येतील आणि त्यांची मंत्रिमंडळात वापसी होईल, असा दावा अमोल मिटकरी यांनी केला.

हेही वाचा - Heat Wave in Vidarbha : विदर्भातील सर्वच जिल्ह्यात उष्णतेची लाट, एप्रिलमध्ये पुन्हा तापणार!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.